मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेमुळे एकाचा मृत्यू

गुरूवार, 12 सप्टेंबर 2019 (11:23 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेमुळे एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर त्याच्या 66 वर्षांच्या आजोबांना गंभीर दुखापत झाली आहे. 
 
अलवर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
 
"माझे भाऊ चेत्राम यादम दवाखान्यातून घरी येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा 6 वर्षांचा नातू होता. यादरम्यान मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारनं त्यांना धडक दिली," असं कर्तार सिंग यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मोहन भागवत यांनी ताफा लगेच थांबवला आणि दोघांना दवाखान्यात पाठवल्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला, असं RSSनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मुंबईत महिलेसमोर अश्लील कृत्य करणार्‍या ऑटो ड्राइव्हरला अटक