कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात घरगुती विजेचा वापर जास्त झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल नेहमीपेक्षा जास्त आलं आहे.अशा स्थितीत ग्राहक वीज बिल हप्त्यांनी भरू शकतात, असं वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं.
लॉकडाऊन काळात घरगुती विजेचा वापर वाढला. त्याचवेळी एप्रिल महिन्यात विजेचे दरही वाढले होते. त्यामुळे ग्राहकांना बिल जास्त आलं आहे. याबाबत मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना दिलासा मिळण्यासाठी वीज बिल हप्त्यांच्या स्वरूपात घेतलं जाऊ शकतं, असं राऊत म्हणाले.