आज नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता आहे, मग देशावर दहशतवादी हल्ले कसे होतात? दहशतवादी देशात घुसतात कुठून? तुमच्या हातात पूर्ण सत्ता आहे, मग पुलवामा हल्ला झालाच कसा, असे प्रश्न राज ठाकरे यांनी साताऱ्यातल्या एका सभेत विचारला. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले, असंही ते म्हणाले.
एका मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही. मोदींच्या याच वक्तव्यांचा आधार घेत पुलवामा ठरवून घडवलं गेलं का? आमचे 40 मारले की काय? असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला.
काश्मीरमध्ये चेक पोस्ट मोडून घुसणाऱ्याला भारतीय सैनिकांनी गोळी मारली होती. त्यावेळी मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या होत्या. अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी सैनिकांचं मनोबल खच्चीकरण केल्याचं ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे निवडणूक लढवणार नसले तरी ते अन्यायाविरुद्ध लढणार असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.