Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

मनसेचे राजनाथ सिंह यांना उपरोधक पत्र विनोद तावडे यांना तुमच्या गाडीत बसू द्या

vinod tavade
, बुधवार, 17 एप्रिल 2019 (17:02 IST)
मनसेने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाना साधला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या....मनसेचे राजनाथ सिंगांना पत्र अश्या आशयाचे मनसेचे नवी मुंबई शहर प्रमुख गजानन काळे यांनी पोस्ट लिहिली आहे. तर यामध्ये त्यांनी उपरोधक असे पत्र लिहिले आहे. यामध्ये विनोद तावडे यांना तुमच्या गाडीत बसू द्या अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यात भाजपा आणि मोदींविरुद्ध सूर आळवण्यात येत आहे. आतापर्यंत राज ठाकरेंच्या तीन राजकीय सभा पार पाडल्या आहेत.या सभांमधून राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर राजकीय स्ट्राईक केला. त्यामुळे भाजपाने सुद्धा त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये दोघांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या टूरिंग टॉकिजची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी, असा आरोप विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. तावडेंच्या या टीकेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तावडेंना लक्ष्य केलं आहे. या पूर्वी जेव्हा एकदा विनोद तावडे हे राजनाथसिंह यांना भेटले होते तेव्हा त्यांच्या सोबत गाडीत बसायला गेले होते त्यावेळी राजनाथसिंह यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले होते. हाच धागा पकडून मनसेने तावडे यांच्यावर निशाना साधला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुलढाणा येथे बसस्थानकात प्रेमी युगुलाला प्रेयसीच्या घरच्यांनी चोपले व्हिडियो व्हायरल