Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

रवीश कुमार यांना रॅमन मॅगसेसे : ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो ते राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

Ravish Kumar to Ramon Magsaysay
, शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (14:06 IST)
भारतीय पत्रकार रवीश कुमार यांना 2019साठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह एकूण पाच जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 
इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडच्या मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना नीलापजीत, फिलिपाइन्सचे संगीतकार रेमुंडो पुजांते कायाबयाब आणि दक्षिण कोरियामध्ये तरुणांमधील हिंसा आणि मानसिक आरोग्याविषयी काम करणारे कार्यकर्ते किम जोंग-की यांचा समावेश आहे.
 
एप्रिल 1957मध्ये न्यूयॉर्क मधील रॉकफेलर ब्रदर्स फंडच्या ट्रस्टींनी फिलिपाइन्स सरकारच्या सोबत या रॅमन मॅगसेसे पुरस्कारांची स्थापन केली होती.
 
फिलिपाइन्सचे माजी अध्यक्ष असणाऱ्या रॅमन मॅगसेसेंच्या नावे हे पुरस्कार देण्यात येतात.
 
कोण होते रॅमन मॅगसेसे?
रॅमन डेल फिएर्रो मॅगसेसे एक फिलिपिनो राजकारणी होते.
 
ते फिलिपाइन्सचे सातवे अध्यक्ष होते.
 
30 डिसेंबर 1953ला विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
 
कम्युनिस्ट हुकबालाहाप (हुक) चळवळीचा पराजय केल्याबद्दल ते ओळखले जातात.
 
रॅमन मॅगसेसे यांचा जन्म एका कामगाराच्या घरी झाला होता. ते लुझॉन बेटावरील इबा प्रांतात एका शाळेत शिक्षक होते. फिलिपाइन्समधील बहुतेक राजकीय नेते स्पॅनिश वंशाचे होते. मात्र मॅगसेसे सामान्य फिलिपिनो नागरिकांप्रमाणे मलाय वंशाचे होते.
 
फिलिपाइन्सची राजधानी मनिला जवळच्या जोसे रिझाल कॉलेजमधून शिक्षण घेत त्यांनी 1933मध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर ते मनिलातल्या एका वाहतूक कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पदावर रुजू झाले.
 
दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते लुझॉनमध्ये गोरिलाप्रमुख (युद्धामध्ये सहभागी होणाऱ्या गटाचा प्रमुख) म्हणून सहभागी झाले होते. अमेरिकेने फिलिपाइन्स पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर त्यांची त्यांच्या 'झंबालेज' प्रांताच्या 'मिलिट्री गव्हर्नर'पदी नेमणूक करण्यात आली.
 
अध्यक्ष एलपिडिओ क्विरिनो यांनी मॅगसेसे यांची सुरक्षा सचिव पदावर नेमणूक करत हुक चळवळीचा बिमोड करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलं. त्यानंतर 1953पर्यंत मॅगसेसे यांनी राबवलेली 'अँटी गोरीला' मोहीम ही आधुनिक इतिहासातल्या सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक मानली जाते.
 
सर्वसामान्यांचा पाठिंबा नसेल तर हुक चळवळ टिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर लष्कराने सामान्यांना सन्मानाने वागवावं असं सांगतं तसंच गरीब शेतकऱ्यांना जमीन आणि अवजारं देऊ करत, त्यांना सरकारच्या बाजूला वळवून घेतलं.
 
भ्रष्ट आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांना काढून टाकत त्यांनी लष्करामध्ये बदल घडवून आणले आणि गोरिलांविरुद्धच्या युद्धामध्ये चपळतेने हालचाली करण्यावर भर दिला.
 
1953 पर्यंत हुक चळवळ मोडीत निघाली होती. पण मॅगसेसे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे सरकारमध्येच त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले होते. क्विरिनो सरकारवर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांना 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा द्यावा लागला.
 
मॅगसेसे हे उदारमतवादी असूनही नॅशनलिस्टा पार्टीने त्यांना अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला. 1953च्या निवडणुकीमध्ये ते क्विरिनो यांच्या विरोधात उभे राहिले. तिसऱ्या पक्षाचे कार्लोस पी. रोमुलो यांचा पाठिंबाही त्यांना मिलाला होता.
 
फिलिपाइन्समधल्या नागरिकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याचं आश्वासन मॅगसेसे यांनी दिलं होतं. पण देशातल्या श्रीमंताच्या हेतूंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जुन्या विचारसरणीच्या काँग्रेसमुळे त्यांच्या प्रयत्नांत अडथळे येत होते.
 
जुलै 1955मध्ये सुरुवातीला काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. पण असं असूनही परिणामकारक जमीन सुधारणा कायदा मंजूर करण्यात मॅगसेसे यांना यश आलं नाही.
 
हुकच्या विरोधात जाऊन लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी केलेलं सगळं चांगलं काम सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने वाया गेलं. मात्र असं असूनही त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही आणि कधी भ्रष्ट न झालेले नेते म्हणून त्यांची ओळख कायम राहिली.
 
परराष्ट्र धोरणांबाबत बोलायचं झालं तर मॅगसेसे हे अमेरिकेचे जवळचे मित्र आणि समर्थक होते. शीतयुद्धाच्या काळामध्ये त्यांनी कम्युनिझमचा उघडपणे विरोध केला होता.
 
8 सप्टेंबर 1954 रोजी मनिलामध्ये 'साऊथ-ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन'ची स्थापना झाली. त्यांनी फिलिपाइन्सला या समूहाचं सदस्य केलं होतं. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच मॅगसेसे यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे म्हणतात, मला ईडीच्या चौकशीचा काही फरक पडक नाही