Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊत : 'संजीव भट्ट यांच्या पत्रावर गुजरातमध्ये काय कारवाई केलीत?'

संजय राऊत : 'संजीव भट्ट यांच्या पत्रावर गुजरातमध्ये काय कारवाई केलीत?'
, मंगळवार, 23 मार्च 2021 (16:52 IST)
गुजरातमध्ये आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही तत्कालीन गुजरात सरकारबद्दल पत्र लिहून अनेक गोष्टी उघडकीस आणल्या होत्या, त्यावेळी त्या पत्राबाबत काय कारवाई केलीत? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रात परमबीर सिंह यांच्या पत्रावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. मात्र, त्यांचा पूर्ण रोख 'गुजरातमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय' यावर होता.
संजय राऊत म्हणाले, "जर एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावर तुम्हाला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा राजीनामा हवा असेल, तर गुजरातमधील घटना आठवा. तिथले आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, शर्मा यांनी वारंवार असं पत्र गुजरात सरकारबाबत लिहिलं होतं. त्या पत्रावर आधारित तत्कालीन मुख्यमंत्री किंवा आजच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार आहात का?"
"तुम्ही संजीव भट्ट यांना तुरुंगात टाकलत. शर्माही बहुधा तुरुंगात आहेत. महाराष्ट्रात एक न्याय आणि गुजरातमध्ये दुसरा न्याय," असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
सोमवारी (22 मार्च) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महाराष्ट्रातील परमबीर सिंह यांच्या पत्राचा उल्लेख झाला आणि त्यावरून मोठा गोंधळही झाला.
त्याबाबत संजय राऊत म्हणाले, "जे लोक काल लोकसभा आणि राज्यसभेत नाचत होते, त्यांना माझं आवाहन आहे की, संजीव भट्ट यांचं पत्रही समोर आणा आणि त्यावर कारवाईची मागणी करा."
 
"एका पत्रावरून राज्यसभा, लोकसभेत, मुंबईई-महाराष्ट्रात भाजपचे लोक तांडव करतायेत, त्यांनी गुजरातमध्ये संजीव भट्ट आणि शर्मांनी पत्रव्यवहार करून ज्या गोष्टी उघडकीस केल्या, त्यावरून सरकार का बरखास्त केलं नाही? त्या पत्रावर सुद्धा भाजपचे लोक नाचतील का, आम्ही बँडबाजा पुरवतो," असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी परमबीर सिंह यांच्या सुप्रीम कोर्टात जाण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
"परमबीर सिंह महाराष्ट्र सरकारवर दबाव आणत असतील, तर महाराष्ट्र सरकारनं यावर विचार केला पाहिजे," असं राऊत म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?