Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेशी युती - चंद्रकांत पाटील

कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेशी युती - चंद्रकांत पाटील
, शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (11:02 IST)
शिवसेना आणि भाजपची विचारसरणी जुळणारी आहे. तसेच, कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेशी युती केली आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  
 
"गेल्या विधानसभा निवडणुकीत युती नसताना दोन्ही काँग्रेसला मिळालेली मतं आणि यावेळी त्यांची झालेली आघाडी विचारात घेता कसलाही धोका नको म्हणून युती केली," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
तसेच, निवडणुकीनंतर महायुतीचेच सरकार आल्यावर घटक पक्षांचा मान-सन्मान कायम राखला जाईल, असंही ते म्हणाले.
 
यावेळी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवरील टीकेबाबतही मत मांडलं. ते म्हणाले, "शरद पवार आमचे दुश्मन नाहीत किंवा त्यांच्याशी बांधावरचे भांडण नाही. आम्हाला त्यांचा आदरच. मात्र आमचा पक्ष आणि आमची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्यावर टीका करणं, कोंडी करणं अपरिहार्य आहे."
 
या निवडणुकीनतंर शरद पवार यांची ताकद संपल्यास दोन्ही काँग्रेस आपोआप संपुष्टात येतील, असा दावाही चंद्रकांत पाटलांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरेंना काँग्रेसमुळं आघाडीत घेऊ शकलो नाही - अजित पवार