भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले पहिले राफेल

शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (11:08 IST)
भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल हे विमान दाखल झाले आहे. फ्रान्सने हे विमान दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फ्रान्समधील दसॉ अॅव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे.  
 
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राफेल करारावरुन मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी वारंवार निशाणा साधला होता. तसेच राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबांनींचा फायदा व्हावा म्हणून मध्यस्थाचे काम केले असाही आरोप केला होता. इतकंच नाही तर राफेल विमानाची किंमत आघाडीच्या काळापेक्षा वाढवण्यात आली असंही काँग्रेसने म्हटलं होतं.
 
राफेल कराराचा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर चांगलाच गाजला होता. आज अखेर फ्रान्सने पहिल्या विमानाची डिलिव्हरी भारताला दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख बजरंग पुनियानला जागतिक कुस्ती स्पर्धेत तिसऱ्यांदा पदक