Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेला सुरूवात

eknath uddhav
, मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (09:40 IST)
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्याकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे.
 
ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, रश्मी ठाकरे यांचं नवरात्रीतील शक्तीप्रदर्शन याद्वारे एकनाथ शिंदेंना ठाण्यात शह देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे.
 
दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात 9 ऑक्टोबरला सभा घेणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथे संध्याकाळी ही सभा पार पडेल. या सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे.
 
महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनेच होणार आहे.

Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'...तर अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळेल' - उज्ज्वल निकम