Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातले 15 ठळक मुद्दे, जे तुमच्यासाठी आहेत महत्त्वाचे

निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातले 15 ठळक मुद्दे, जे तुमच्यासाठी आहेत महत्त्वाचे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात सामान्यांना आयकरात कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यांच्या अर्थसंकल्पातले 15 महत्त्वाचे मुद्दे जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
 
पेट्रोल-डिझेल प्रती लिटर एक रुपयाने महाग होणार, तर सोनं आणि मौल्यवान धातूही महाग होणार
आयकरात कोणतेही बदल नाहीत
इलेक्ट्रिक कार आणि 45 लाख रुपयांच्या घर खरेदीच्या व्याजावरील टॅक्समध्ये सूट
आयकर भरताना पॅन कार्डऐवज आधार कार्डही स्वीकारलं जाईल
एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांप्रमाणे आता 20 रुपयांचं नाणंही बाजारात येणार
दोन ते पाच कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना 3% सरचार्ज तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना 7% सरचार्ज
वार्षिक 400 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना 25 टक्के कर आकारणार, यात 99.3 टक्के कंपन्यांचा समावेश
एका वर्षात एक कोटींपेक्षा जासत पैसे बँकेतून काढल्यास 2 टक्के टीडीएस आकारला जाईल
येत्या 2 ऑक्टोबरपासून सर्व शहरांमधील सार्वजनिक स्वच्छतागृह मोफत केली जाणार
2024 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील सर्व घरात पिण्याचं पाणी पोहोचवणार
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एलपीजी आणि वीज कनेक्शन देणार
एअर इंडियातील निर्गुंतवणूक वाढवणार
सिंगल ब्रँड रिटेलसाठी स्थानिक नियम अधिक सोपे करणार
कामगारांशी संबंधित सर्व कायदे चार कोडमध्ये विलीन करणार
हवाई वाहतूक, माध्यमं आणि अॅनिमेशनमधील परकीय गुंतवणुकीच्या मर्यदांवर विचार करणार
तुमच्या रोजच्या वापरातल्या वस्तू किती महाग झाल्या आहेत ते तुम्ही इथं चेक करू शकता.
 
काय महाग?
पेट्रोल
डिझेल
आयात पुस्तकं
तंबाखूजन्य पदार्थ
सोनं आणि मौल्यान धातू
सीसीटीव्ही
गाड्यांचे पार्ट्स
काय स्वस्त?
इलेक्ट्रिक वाहनं

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनमध्ये पर्यटक नजरकैदेत : फोनमध्ये जबरदस्ती केला जातोय मॅलवेअर