विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण केल्याने लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करू लागले आणि घाबरले, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
योगी आदित्यनाथ काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी (17 मे) ते मुजफ्फरनगर येथे बोलत होते. साथीच्या आजारात लोकांना धीर देण्याची गरज असताना विरोधी पक्ष मात्र लोकांना घाबरवत आहेत असा आरोप त्यांनी केला.
उत्तर प्रदेशात 300 ऑक्सिजन प्लँट उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिली, तसंच उत्तर प्रदेशामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्याचंही ते म्हणाले.
आतापर्यंत साडेचार कोटी कोरोना चाचण्या झाल्याची माहिती त्यांनी दिली.