Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओरीसातील देखणे कटक

Webdunia
WD
कटक हे शहर ओरीसा राज्यात असून राजधानी भुवनेश्वरपासून 30 किलोमीटरवर आहे. ' प्राचीनता आणि आधुनिकतेचे सुरेख संगम' हे या शहराचे खास वैशिष्‍ट्य आहे.

इतिहास
महानदीच्या (कथजुरी) किनारी वसलेले कटक ओरीसाची जुनी आर्थिक राजधानी होती. म्हणून हे शहर सांस्कृतिक, व्यापार, अर्थकारण, हस्त शिल्पकलेच्या दृष्‍टीने महत्त्वाचे आहे. इसवी सन 989 मध्ये केशरी राजवंशाने येथे सैनिक शिबीराचे आयोजन केले होते. त्यानंतर अकराव्या शतकात केशरी राजवंशाने ग्रेनाइटपासून धरणाचे बांधकाम केले होते. चौदाव्या शतकात बाराबाटी किल्ल्याची स्थापना याच राजघराण्याने केली होती.

सुमारे दोनशे वर्षानंतर ओरीसाचे महाराज मुकुंदा हरिचंदन यांनी या धरणाशेजारी नऊ मजली इमारतीचे बांधकाम केले. अठराव्या शतकात मराठ्यांनी या शहरावर आपले राज्य स्थापित केले. कालांतराने मराठ्यांच्या राज्याचा विस्तार होत गेला. इंग्रजांबरोबर व्यापार करताना मराठा राज्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आकर्षक मंदिराचे बांधकाम केले. इंग्रजांनी जेव्हा ओरीसावर आपली हुकूमत प्रस्थापित केली. तेव्हा कटकला ओरीसाची राजधानी म्हणून इंग्रजांनी घोषित केले होते. परंतु, काही कारणास्तव नंतर इंग्रजांनी राजधानी भुवनेश्वरला हलविली.

कटक शहर हस्तशिल्प कलेसाठी प्रसिद्ध आहे. येथील पिपली गावात विविध प्रकारच्या कलाकृती पाहायला मिळतात. कलेचे हे रूप आपल्याला सरकारी एंपोरीयममध्येही पाहू शकता. ताराकाशी येथील प्रसिद्ध हस्तशिल्पकला असून ही कला अद्वितीय आहे. पंधराव्या शतकापासून या कलेचा वापर केला जात आहे.

काय पाहाल?
WD
चिल्का सरोव र
मतई नदीच्या किनारी दक्षिणेला हे सरोवर आहे. सायबेरीया, इराण, इराक, अफगाणिस्तान या देशांतून अनेक पक्षी ऑक्टोबर महिन्यात स्थलांतर करत येथे येत असतात. पक्ष्यांच्या 150 पेक्षा अधिक जाती आपल्याला येथे पहाता येतात. सुमारे 200 जातीचे मासे आणि डॉल्फिन या सरोवरात दिसून येतात.

WD
धोल ी
धोली येथे कलिंग युद्ध झाले होते. महाराज अशोकाच्या मनात येथेच बौद्ध धर्माचे बीजारोपण झाले होते. येथील मूर्तीही देखण्या आहेत.

बाराबाटी किला
चौदाव्या शतकात निर्माण केलेला हा किल्ला आकर्षक, सुंदर आणि
WD
अनोख्या हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. काथाजोडी नदीच्या किनारी असलेल्या या किल्ल्यात काही पौराणिक मंदिरांचे अवशेष आहेत. या म‍ंदिरात भगवान जगन्नाथाची मूर्ती होती. परंतु, मुगल राजा फिरोज शहा तुघलकने ती फोडली होती. कटकमध्ये प्रामुख्याने दुर्गा देवीची पूजा केली जाते.

कसे पोहचाल?
कटकजवळच भुवनेश्वर येथे विमानतळ असून येथून देशातील विविध ठिकाणी विमानसेवा उपलब्ध आहे.

रस्तामार्ग-
कटक शहरापासून राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक- 5 जात असल्यामुळे पर्यटकांना येथे पोहचण्यास सोपे आहे.

रेल्वेमार्ग-
चेन्नई ते कोलकातापर्यंत जाणार्‍या रेल्वेमार्गावर कटक आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments