Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांबरोबर पिकनिकला जाताय..

Webdunia
WD
धावपळीच्या जीवनात मुलांसाठी आपल्याकडे वेळच नसतो म्हणून आपण सुट्यांची प्रतीक्षा करत असतो. सुट्या लागताच मुलांबरोबर पिकनिकला जाण्याची इच्छा होते. मुलांना फिरायला नेण्याचे निमित्त असतेच आणि आपणही एकदम फ्रेश होऊन जातो. पण, मुलांबरोबर फिरायला जाताना आपण छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन केले तर पिकनिक सुखकर होते. यासाठी आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत...

* प्रवासास निघण्यापूर्वी वातावरणाचा अंदाज घेऊन कपडे बरोबर घ्या. (उद ा. : खूपच उन्ह असेल तर कॅप, गॉगल वगैरे आणि थंडी असेल तर स्वेटर, कानटोपी वगैरे ) नदी, तलावाकाठी जात असाल पोहण्याचे कपडे, टॉवेल बरोबर ठेवा. प्रवासावेळी मुलांना मोजे, बूट द्यालण्यास द्यावेत.

* प्रवासावेळी खाण्यापिण्याचे पदार्थ बरोबर घ्या. शक्यतो कोरडे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करावा. त्याबरोबरच पेपर प्लेट्सही घ्या.

* आवश्यक कागदपत्रे बरोबर असावीत. महत्त्वाची कागदपत्रांची झेरॉक्स बरोबर ठेवा. लायसन्स, पासपोर्ट वगैरे कागदपत्रे जवळ आहेत की नाहीत याची खात्री करा.

* कपड्यांबरोबरच गरजेची औषधेही बरोबर ठेवा. लहान मुलांच्या दृष्टीने औषधे त्याबरोबर त्यांच्यासाठीचे अन्न बरोबर घ्या.

* ज्याठिकाणी जात आहात तेथील हॉटेलचा नंबर व इतर माहिती जवळ ठेवावी. बस अथवा रेल्वेचे वेळापत्रकही माहीत असणे आवश्यक आहे.

* ज्या ठिकाणी फिरायला जात आहात त्याची माहिती करून घ्यावी, तसेच अंतर माहीत करून घ्यावे जेणेकरून वेळेचे नियोजन करता येईल.

* आपल्या बॅगांची संख्या मोजून चढउतार करताना सर्व बॅग बरोबर आहेत की, नाहीत याकडे लक्ष ठेवा

* मुलांना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्याच्या सूचना करा

* रेल्वे, विमान अथवा ट्रॅव्हल्सचा प्रवास असेल तर प्रवासापूर्वी आरक्षण करा.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

Show comments