Marathi Biodata Maker

कर्नाटकमधली थंड हवेची ठिकाण

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2024 (06:39 IST)
कर्नाटक हे विविधतेने नटलेलं राज्य. एकीकडे अत्यंत सुंदर समुद्रकिनारे तर दुसरीकडे टुमदार थंड हवेची ठिकाणं इथे पाहायला मिळतात. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी आल्हाददायक वाटतं. कर्नाटकमधल्या अशाच काही थंड हवेच्या ठिकाणांची हीओळख...
* चंद्रद्रोण पर्वतरांगांमध्ये वसलेलं केमानागुंडी खूपच मनमोहक आहे. इथल्या पाण्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचाविकार बरे होत असल्याचं म्हटलं जातं. हेबे आणि कल्हाटागिरी धबधबा, राजभवन आणि भद्रा व्याघ्र प्रकल्प ही इथली काही खास आकर्षणं आहेत.
* पश्चिम घाटातल्या कुर्गच्या सौंदर्याचं वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही. निसर्गसौंदर्यामुळे कुर्गला भारताचं स्कॉटलंड असं म्हटलं जातं. इथे ट्रेकिंग आणि कॅम्पिंगही करता येतं.
* समुद्रसपाटीपासून 3400 फूट उंचीवरचं चिकमगलूरही थंड हवेचं ठिकाण आहे. आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगलं आणि उंचच उंच पर्वतरांगा आपलं मन मोहवून टाकतात.
* बिलिगिरीरंगा हिल्स हे सुद्धा अनोखं ठिकाण आहे. इथे पूर्व आणि पश्चिम घाट एकमेकांना मिळतात. इथे अभयारण्यही आहे. इथून कावेरी आणि कपिला या दोन ना वाहत असल्यामुळे पर्यटक रिव्हर राफ्टिंग, मासेमारी तसंच बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.
* अगुंबेला दक्षिणेचं चेरापुंजी असं म्हटलं जातं. इथेही काही काळ निवांत घालवता येईल. अगुंबेला मालगुडी डेजचं चित्रीकरण पार पडलं होतं. 
सुहास साळुंखे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

वृंदावनची ५ सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे, या मंदिरांना भेट दिल्यावर तुम्हाला एक अनोखी शांती अनुभवायला मिळेल

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

बायको उन्हाळ्यात माहेरी जाताना घालते अट

पुढील लेख
Show comments