rashifal-2026

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

Webdunia
रविवार, 14 ऑक्टोबर 2018 (00:45 IST)
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले जाते. इटलीतील रोम इंटर्नल शहर म्हणून ओळखले जाते तसेच भारतातील वाराणसी प्राचीन नगरी किंवा स्वर्ग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. सोविएत संघातून फुटून निघाल्यावर सध्या स्वतंत्र भोगत असलेल्या अर्मानिया या चिमुकल्या देशाची राजधानी येरेवान हे असेच प्राचीन शहर असून हे शहर 2800 वर्षे जुने असल्याचे इतिहास सांगतो. या देशाची लोकसंख्या आहे 30 लाख. मात्र या देशाचे नाव जगात प्रसिद्ध झाले ते येथे झालेल्या वेलवेट क्रांतीमुळे. दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या नेत्यास त्याचे पद सोडून पायउतार होण्यासाठी ही शांततापूर्ण क्रांती केली गेली आणि ती जगात गाजली. येरेवान हे शहर प्राचीन असले तरी अतिसुंदर, शांत आहे आणि त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी नेहमीच होते. येथील नागरिक अतिशय मोकळ्या मनाचे आणि चटकन मैत्री करणारे आहेत. खाणे-पिणे आणि गप्पा हे त्यांना अतिप्रिय. या शहरातील बहुतेक सर्व लोक एकमेकांना ओळखतात. शहरातील सर्व नागरिक आमचे मित्र, शेजारी आणि सहकारी आहेत असे येथील नागरिक सांगतात. या लोकांना परदेशी भाषा चटकन आत्मसात करण्याचे अनोखे कौशल्य लाभले आहे. पर्यटकही त्यांच्या या कौशल्याने आश्चर्यचकित होतात. येथे इंग्रजी, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश आणि फारसी भाषा बोलल्या जातात. या शहरात सतत काही न काही उत्सव साजरे होत असतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments