Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पक्ष्यांचे माहेरघर सुलतानपूर

पक्ष्यांचे माहेरघर सुलतानपूर
, शुक्रवार, 30 जुलै 2021 (23:54 IST)
सुलतानपूर नॅशनल पार्क राजधानी दिल्लीपासून 45 किलोमीटरवर तर गुड़गावपासून अवघ्या 15 किलोमीटरवर आहे. विविध जाती-प्रजातीचे पक्षी, घनदाट वनराईमुळे हे नॅशनल पार्क रमणीय आहे. सुलतानपुरला सन 1972 मध्ये 'वॉटर बर्ड रिझर्व्ह' म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक, पक्षीमित्र हजेरी लावत असतात.
 
सुलतानपूरला नैसर्गिक कोंदण लाभले आहे. उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारे धबधबे जणू आपल्याला हाक मारताना भासतात. धबधब्याच्या पायथ्याशी विविध रंगबिरंगी पक्षी आपले स्वागत करताना दिसतात. हे पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून येथे आलेले असतात. प्रामुख्याने सप्टेंबरमध्ये येथे मोठ्या संख्येने देश-विदेशातून पक्ष्यांचे आगमन होत असते.
 
त्या काळात येथे जणू पक्षांचा कुंभमेळा भरतो. पर्यटकाना विविध जातीच्या परदेशी पक्ष्यांना पाहता येते. पक्षी निरिक्षणासाठी येथे मोठ्या संख्येने वॉच टॉवर उभारले आहेत. येथील पक्षांचा किलबिलाट मन गुंतवणारा ठरतो. येथे किंगफिशर, ग्रे पेलिकेन्स, कार्मोरेंटस, स्पूनबिल्स, पोंड हेरोंस, व्हाइट इबिस आदी पक्षी पहायला मिळतात. तसेच नीलगाय येथील मुख्य आकर्षण आहे.
 
पक्षांची सुरक्षितता जपावी यासाठी येथील तळ्यात बोटींगला बंदी‍ आहे.
 
डिसेंबर- जानेवारी महिन्यात सुलतानपूर नॅशनल पार्कमध्ये जाण्याचे प्लॅनिंग करायला काही हरकत नाही. कारण सप्टेबर महिन्यात येथे दुर्लभ प्रवासी पक्ष्यांचे आगमन होते व डिसेंबर व जानेवारी हे दोन महिने ते येथे मुक्कामाला असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फुकटचा चहा......