Foreign Tourism : डिसेंबर लागला असून डिसेंबर म्हणजे गुलाबी थंडी होय. तसेच या गुलाबी थंडीच्या डिसेंबर मध्ये लहान मुलांचा आवडता सण ख्रिसमस येतो. ख्रिसमस हा 25 डिसेंबरला आहे. तसेच मुलांना सांताक्लॉज सर्वात जास्त आवडतात. जर तुम्ही मुलांना सांताक्लॉजच्या गावी फिरायला नेले तर ते त्यांच्यासाठी स्वप्नासारखे असेल. ख्रिसमसच्या वेळी सांताक्लॉज जिथे राहत असत तिथे मुलांना भेट देण्याची नक्कीच घेऊन जा. या करिता आज आपण पाहणार आहोत सांताक्लॉजचे गाव, तर चला जाणून घेऊ या.
ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा एक प्रमुख सण असला तरी देखील संपूर्ण जग दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतो. हा सण लहान मुलांसाठी सर्वात खास असतो. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी मुले सांताक्लॉज आणि त्याने आणलेल्या भेटवस्तूंची वाट पाहत असतात. तसेच लाल कपडे आणि लाल टोपी घातलेल्या या पांढऱ्या दाढीच्या सांताक्लॉजची प्रत्येकजण वाट पाहत असतो. जर आपणच सांताक्लॉजच्या गावाला भेट दिली तर किती अद्भुत असेल ना.
सांताक्लॉजचे गाव-
सांताक्लॉजचे गाव फिनलंडमधील लॅपलँड येथे आहे, जे नेहमी पांढऱ्या बर्फाने झाकलेले असते. लोक या गावाला रोव्हनेमी म्हणून ओळखतात. तसेच या गावात वसलेले घर पाहिल्यानंतर तुम्हाला खरोखरच ते सांताक्लॉजचे घर आहे असे वाटेल, जसे पुस्तकांमध्ये बर्फाने झाकलेले घर दाखवले असतात. इथे गेल्यावर फक्त मुलांनाच नाही तर तुम्हालाही ते स्वप्नांच्या दुनियेमध्ये आल्यासारखे वाटेल. तसेच विशेष म्हणजे या गावात एक खास पोस्ट ऑफिस आहे, ते सांताचे पोस्ट ऑफिस मानले जाते, जिथे लोक वर्षभर पत्र पाठवतात. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही पत्रे वाचून सांताही त्याला उत्तर देतो. तसेच तुम्हाला या गावात सगळीकडे खेळणी आणि भेटवस्तू दिसतील. येथे काम करणारे कर्मचारी प्रत्येक पत्र वाचून त्याला उत्तर देतात. पांढऱ्या दाढी आणि लाल कपड्यांसह येथील कर्मचारी सांताक्लॉजच्या वेशात फिरतात. ख्रिसमसला भेट देण्यासाठी यापेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही.
सांताक्लॉजचे गाव फिनलंडमधील लॅपलँड जावे कसे?
सांताक्लॉजच्या गावाला भेट द्यायला जायचे असल्यास सर्वात आधी रोव्हनेमी सिटीला जावे लागते. हेलसिंकी येथून विमान मिळेल. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. रोव्हानिमी हे फिनलंडमधील एक शहर आहे, जिथे जाण्यासाठी विमानाने जावे लागते. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी येथे विशेष रेल्वेची सुविधा देखील आहे. सांताक्लॉजचे गाव लॅपलँडमध्ये आहे. त्यामुळे रोव्हानेमी सिटीत पोहोचल्यानंतर तुम्हाला लॅपलँडला जावे लागेल. लॅपलँड हे रोव्हानिमीपासून काही किमी अंतरावर आहे. रोव्हनेमी ते सांताच्या गावापर्यंत एक विशेष रेल्वे धावते, जी दर तासाला चालत राहते. सांता एक्सप्रेस असे या ट्रेनचे नाव असून जर तुम्हाला रेल्वेने जायचे नसेल तर तुम्ही कॅब बुक करून नक्कीच सांताक्लॉजचा गावाला पोहचू शकतात.