Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कालरात्री देवी मंदिर वाराणसी

Webdunia
बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. देवीच्या मात्र दर्शनाने भक्त भयमुक्त होतो.  कालरात्री देवीचे मंदिर वाराणसी मध्ये मीरघाट जवळ स्थित आहे. हे मंदिर खूप प्राचीन आणि प्रसिद्ध मानले जाते. नवरात्रीत हजारो भक्त देवी कालरात्रीचे दर्शन घेण्यासाठी येतात. नवरात्रीत भक्त देवीला प्रसाद स्वरूप लाल चुनरी, सिंदूर आणि बांगड्या आणि नारळ अर्पण करतात. 
 
असे म्हणतात की देवीआईच्या मंदिरात भक्ताने डोके टेकवून तिच्याकडे काहीही मागितले तरी आई ते नक्कीच पूर्ण करते. तसेच चतुर्भुज मातेचे रूप प्रत्यक्षात दिसते तितके राक्षसी नाही. देवी माता अतिशय सौम्य स्वभावाची असून तिच्या दर्शनाने सर्व नकारात्मक शक्ती निघून जातात. देवी कालरात्री मंदिराच्या पौराणिक आख्यायिका नुसार एकदा भगवान शंकर माता पार्वतीची थट्टा करीत म्हणाले की, देवी तुम्ही किती सावळ्यादिसत आहात यामुळे नाराज होऊन माता पार्वती काशी मध्ये निघून आली व शेकडो वर्ष तिने इथे तपश्चर्या केली. मातेच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भोलेनाथ या पवित्र स्थानी आले आणि मातेला म्हणाले की देवी चला तुम्ही,गोऱ्या झाल्या आहात आणि मातेला सोबत घेऊन कैलासला निघून गेले . मंदिराच्या प्रांगणात तुम्हाला केदारेश्वराचे शिवलिंगही पाहायला मिळेल. तसेच मंदिरात दोन सिंहांच्या मूर्ती देखील आहे.
 
तसेच शारदीय नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी या मंदिरात विशेष पूजा केली जाते तसेच देवीला शृंगार करून  मंगला आरती केली जाते व भक्तांसाठी देवीच्या दर्शनाचे द्वार उघडले जाते  
 
देवी कालरात्रीच्या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी वाराणसी विमानतळ 30 किमी जवळ आहे तर वाराणसी जंक्शन रेल्वे स्टेशन देखील मंदिरपासून 9 किमी अंतरावर आहे  तसेच मंदिरापासून वाराणसी बेसटॉप देखील जवळ आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

अभिनेता मिथुन चक्रवर्ती दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

Big Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिझन 5 च्या पर्वातील महाविजेता

Singham Again Trailer release: अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

Paani Trailer:पाणी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

डास मारले नाहीत का? त्यावर नोकर काय म्हणाला बघा तर...

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

अभिनेता मिथुन चक्रवर्ती दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

ती माझ्यावर भांडी फेकते

प्रसिद्ध गायिका तुलसी कुमार यांचा शुटिंग करताना अपघात, व्हिडिओ व्हायरल!

पुढील लेख
Show comments