Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

kutch tourism :गुजरात दर्शन करताना कच्छचे रण आवर्जून जावे

kutch tourism :गुजरात दर्शन करताना कच्छचे रण आवर्जून जावे
Webdunia
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (16:54 IST)
एकेकाळी भूकंपाने उद्ध्वस्त झालेला कच्छ आज पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.कच्छचा खार किंवा रण सुमारे 26 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर व्यापलेले आहे. रण म्हणजे मिठाचे दलदल.रण हे दोन भागांमध्ये विभागले गेले आहे - 'ग्रेट रण' आणि दुसरा 'लिटल रण ', हा दक्षिण -पूर्वी दिशेने पसरलेला आहे.कच्छचा वारसा आणि संस्कृती देशात आणि जगभरात पोहोचावा म्हणून गुजरात पर्यटन विभागाने 'रण उत्सव' सुरू केला. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आज कच्छ पर्यटकांची उत्तम निवड म्हणून प्रख्यात झाला आहे. 
 
कच्छचे रण गांधीधामपासून 108 किलोमीटर अंतरावर आहे. कच्छचे रण भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर तसेच पूर्वेस पसरलेला एक खारट दलदलीचा भाग आहे.  हा समुद्राचा एक अरुंद भाग आहे.कच्छच्या रणात पोहोचताच आपल्याला  रंगांनी भरलेले प्रवेशद्वार दिसेल जे टेन्ट शहर' कडे जाते. येथे आपल्याला पारंपारिक नृत्य, संगीत,अन्न, कपडे तसेच हस्तकला, ​​पॅरामोटरिंग, ट्रेकिंग, स्टारगॅझिंग आणि फ्लेमिंगो आढळतील. 
 
येथे वाहनाची व्यवस्था देखील आहे, जेणेकरून आपण रणात मोकळे पणाने फिरू शकता. टेन्ट शहराबाहेर पर्यटकांसाठी स्टॉल्स देखील उभारले आहेत, इथे विविध प्रकारचे दागिने, पर्स, शोपीस आणि नवरात्री पोशाख - घागरा -चोली आणि केडीयू (कोटी) इत्यादी खरेदी करता येऊ शकतं. येथे भेट देण्याचा उत्तम काळ डिसेंबरमध्ये आहे. येथे  रण उत्सव नोव्हेंबर ते मार्च पर्यंत चालू राहतो. 
 
चांदण्या रात्री, या ठिकाणचे सौंदर्य बघण्यासारखे असते.पौर्णिमेच्या रात्री,येथील मिठाची जमीन अशी चमकते की जणू जर पृथ्वीवर पसरली आहे. कच्छचे रण दिवसात पूर्णपणे पांढरे दिसतात. जणू पृथ्वी आणि आकाश एकत्र झाले आहेत. दोघांमध्ये फरक करणे खूप कठीण होते. मोकळे आकाश, थंड वारा आणि मोठे रण, हे सर्व मिळून या ठिकाणाचे सौंदर्य स्वर्गासारखे बनवतात. 
 
वर्ष 2020 मध्ये पूर आल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याने दूरवर जाऊ शकणे शक्य नव्हते.पण हे दृश्यही मंत्रमुग्ध करणारे होते. येथे एक भव्य व्यासपीठ बांधण्यात आले आहे, ज्यावर चढून रणच्या सौंदर्याचे विहंगम दृश्य बघता येते.येथे उंट आणि घोड्यांच्या पाठीला रंगीबेरंगी कपड्यांनी सजवले जाते. यामुळे पर्यटकांना आरामदायी आणि शाही सवारी करण्याचा अनुभव मिळतो. 
 
रण जवळ 'कालो डुंगर' आहे, ज्याची उंची 15-16 फूट आहे,जिथून रणचे विहंगम दृश्य बघायला मिळते. या भागातील 'भिरंदियारा' नावाचे गाव भरतकाम आणि मावा (मिल्क केक) साठी खूप प्रसिद्ध आहे.जर आपण कच्छच्या रणात जात असाल तर इथे आवर्जून भेट द्या.आणि हो, फक्त एक पर्यटक म्हणून जाऊ नका, एक शोधकर्ता म्हणून जावे. इथून आपल्याला बरेच काही शिकायला आणि समजायला मिळेल. चला तर मग परत येऊन काही दिवस कच्छमध्ये घालवा.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड

Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

बायकोचे नवऱ्याच्या बाबतीतले "सप्तसूर"

मडगाव एक्सप्रेस'च्या पहिल्या वर्धापनदिना निमित्त दिग्दर्शक कुणाल खेमूने केली मोठी घोषणा

सलमान खानच्या सुरक्षेमुळे सिकंदरचा प्लॅन बदलला, ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द!

भेट देण्यासाठी अमेरिकेतील सुंदर ठिकाणे

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

पुढील लेख
Show comments