Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (18:00 IST)
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल, सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.या वेळी आपण भारतातील शीर्षच्या हिल स्टेशन मुन्नार ची माहिती जाणून घेऊ या.

मुन्नार (केरळ )
 
1 काश्मीर आणि केरळ याला भारताचा स्वर्ग म्हटले जाते.केरळमध्ये एकीकडे अद्भुत समुद्रकिनारे आहेत आणि दुसर्‍या बाजूला उंच हिरवे  डोंगर त्यातून धबधबे पडताना दिसतात.अशीच एक सुंदर जागा मुन्नर हिल स्टेशन आहे.
 
2 केरळमधील मुन्नार हिल स्टेशन जणू स्वर्गासारखे आहे.हे तीन पर्वतांच्या श्रेण्या मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि  कुंडलच्या संमेलनाचे ठिकाण आहे.
 
3 या हिल स्टेशनची ओळख म्हणजे इथे विस्तृत क्षेत्रात पसरलेली चहाची लागवड,वसाहतीचे बंगले,लहान नद्या,धबधबे,आणि थंड हवामान आहे.
 
4 मोठे चहाचे बाग आणि वळणदार गल्ल्या बघून आपण मोहित व्हाल . चहाच्या लागवड व्यतिरिक्त हे मसाल्याची शेती आणि सुवासा साठी ओळखले जाते. 
 
5 ट्रेकिंग आणि माउंटन बाइकिंगसाठी हे एक उत्तम गंतव्यस्थान आहे. इथे  पर्यटकांमध्ये हाऊसबोटिंग खूप लोकप्रिय आहे.
 
6 चहाचे बाग,वॉन्डरला अम्युजमेंट पार्क,कोची फोर्ट,गणपती मंदिर आणि हाऊसबोट रोमांचकारी आहे.
 
7 मुन्नारपासून अवघ्या15 कि.मी.अंतरावर इरविकुलम नॅशनल पार्क आहे जे दुर्मिळ झालेल्या निलगिरी टार साठी प्रख्यात आहे.हे 97 चौरस किमी पर्यंत पसरलेल्या या उद्यानात फुलपाखरे,प्राणी,आणि पक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती दिसतात.
 
8 निलकुरिंजीची फुले उमलल्यावर अवघा डोंगर त्या फुलांनी झाकला जातो, तेव्हा हे बाग उन्हाळ्याचे पर्यटन स्थळ बनत. ही वनस्पती पश्चिम घाटाच्या या भागाची मूळ वनस्पती आहे, जी बारा वर्षांत एकदा उमलते. हे फुल अंतिम वेळी 2018 मध्ये उमलले होते.
 
9 याशिवाय, आनामुड़ी शिखर, सुंदर सरोवरासाठी माट्टूपेट्टी, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण पल्लीवासल, धबधब्यांसाठी प्रसिद्ध चिन्नकनाल, चहा बाग आणि खेळांसाठी प्रसिद्ध अनयिरंगल, मुन्नार आणि तामिळनाडू आणि नीलाकुरींजी फुले बघण्यासाठी  हे सर्व टॉपचे स्टेशन बघण्याचे पर्यटन स्थळ आहे.
 
10 येथे जाण्यासाठी: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: तेनी (तामिळनाडू), जवळपास 60 किमी अंतरावरील चेंगनचेरीपासून 93 किमी अंतरावर आहे. जवळचे विमानतळ मदुराई (तामिळनाडू) सुमारे 140 किमी अंतरावर आहे. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ अंदाजे190 कि.मी.अंतरावर आहे.
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments