Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सातपुऱ्याच्या टेकड्यांनी वेढलेले पचमढी हिल स्टेशन

Webdunia
सोमवार, 21 जून 2021 (18:25 IST)
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात.भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुऱ्याचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर.काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत,पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.या वेळी आपण भारतातील शीर्षच्या हिल स्टेशन पचमढी ची माहिती जाणून घेऊ या.
 
पचमढी हिल स्टेशन:
 
1 रोमँटिक स्थळ-होशंगाबाद जिल्ह्यात असलेले पचमढी हे मध्य प्रदेशातील एकमेव हिल स्टेशन आहे.याला मध्यप्रदेशातील श्रीनगरआणि स्वित्झर्लंड देखील म्हणतात. रोमँटिक स्थळांपैकी हे शीर्षावर आहे.
 
2 पर्वत- इथे सातपुऱ्याचे अनेक डोंगर श्रेणी आहे आणि सुंदर नयनरम्य दऱ्या देखील आहे.पचमढीला सातपुऱ्याची राणी देखील म्हणतात.इथले उंच आणि हिरवेगार डोंगरांना बघणे आपल्यामध्येच एक रोमांचक अनुभव आहे.
 
3 लेण्या- येथील लेण्यांना पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आहे कारण गुहेत शैलचित्र देखील आढळले आहे.जटाशंकर,पांडव गुहा आणि हांडी खोह प्रख्यात आहे.
 
4 तलाव आणि धबधबे- येथे घनदाट जंगल,धबधबे,आणि बरेच पवित्र तलाव आहे. पांडव लेण्यांकडून पुढे जाताना 30 फूट खोल तलाव आहे ज्याला अप्सरा विहार म्हणतात.या मध्ये पोहण्याचा आणि अंघोळ करण्याचा आनंद घेऊ शकता.या मध्ये एक धबधबा येऊन पडतो.या पुढे गेल्यावर इरण तलाव,रजत प्रपात,बी फॉल्स,आणि डचेज फॉल्स प्रख्यात आहे.
 
5 प्रियदर्शिनी पॉईंट -हे असे स्थळ आहे जिथून पचमढी बघणे आश्चर्यकारक आहे.या ठिकाणातून सूर्यास्त बघणे आल्हाददायक वाटते.तिन्ही बाजूने पर्वत शिखर डावीकडे चौरादेव मधोमध महादेव आणि उजवी कडे सर्वात उंच शिखर धूपगढ दिसत.
 
6 जंगल - इथे गौर,बिबटे,अस्वल,रानटी म्हेस,आणि इतर वन्य प्राणी सहज दिसून येतात.येथे सातपुडा राष्ट्रीय उद्यान आहे. सातपुडा राष्ट्रीय उद्यान 1981 मध्ये 524 चौ.कि.मी. क्षेत्रामध्ये तयार केले गेले.आहे. हे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे.   
 
7 इतर ठिकाणे: महादेव मंदिर, चौरागड मंदिर,रिछागड,डोरोथी डीप रॉक शेल्टर,जलावतारण,सुंदर कुंड,धुपगड इत्यादी काही सुंदर स्थाने आहेत
 
8 कधी जावे-इथले वैशिष्टये आहे की आपण इथे वर्षभरात कोणत्याही हंगामात जाऊ शकता.इथले तापमान हिवाळ्यात 4.5 डिग्री आणि उन्हाळ्यात कमाल 35 डिग्री असत.
 
9 जीप किंवा स्कुटरने फिरावे- या क्षेत्रात फिरण्यासाठी आपण पचमढीतून जीप किंवा स्कुटर भाडेतत्वावर घेऊन फिरू शकता.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

जामीन मिळूनही अल्लू अर्जुन रात्रभर तुरुंगात का राहिला?

Radhika Apte Daughter लग्नाच्या 12 वर्षांनंतर राधिका आपटे बनली आई, बाळाला दूध पाजतानाचा फोटो शेअर केला

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया समोर आली

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

पुढील लेख
Show comments