Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Travel Tips : विमानाने प्रवास करताना या चार चुका करू नका

Webdunia
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (07:26 IST)
पूर्वी विमानाने प्रवास करणे ही खूप मोठी गोष्ट होती, परंतु आता अनेकांना विमानाने प्रवास करणे सामान्य झाले आहे. तरीही भारतासारख्या देशात अशी अनेक कुटुंबे आणि लोक आहेत, जे विमान प्रवासाला स्वप्न समजतात. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक विमानात प्रवास करण्याचे स्वप्न पाहतात. जेव्हा लोक पहिल्यांदा विमानात बसतात तेव्हात्यांना असे वाटते जणू  त्यांची स्वप्ने पूर्ण झाली आहेत. लोकांमध्ये पहिल्यांदाच फ्लाइटमध्ये बसण्याची उत्सुकता असते तर काही लोक विमानात बसताना खूप घाबरतात.
 
जर आपण देखील पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार असाल आणि विमानात उड्डाण करण्याची तयारी करत असाल तर काही खास टिप्सकडे लक्ष द्या जेणेकरून आपला प्रवास अविस्मरणीय होईल आणि विमान प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 तिकीट घेणे विसरू नका -विमानात प्रवास करण्यासाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमानाचे तिकीट असणे. अनेकदा कुतूहलामुळे किंवा घाईने लोक फ्लाइटचे तिकीट किंवा बोर्डिंगची वेळ विसरतात. असं केल्याने आपली फ्लाइट चुकू शकते. लक्षात ठेवा की प्रवास करण्यापूर्वी, सुटण्याच्या वेळेत काही बदल झाला आहे का हे पाहण्यासाठी  फ्लाइट शेड्यूल तपासा. विमान सुटण्याच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. फ्लाइट तिकिटाची प्रिंट काढा. याशिवाय ओळखपत्राची मूळ प्रत जसे की पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा मतदार कार्ड सोबत ठेवा. यासोबतच लहान मूल असेल तर त्याच्या वयाची पुष्टी करणारी कागदपत्रेही ठेवा.
 
2 सामानाचे नियम -आपण फ्लाइटमध्ये आपल्या सोबत घेत असलेल्या सामानासंबंधी एअरलाइनच्या सामानाच्या नियमांबद्दल जाणून घ्या . या आधारावरच आपले सामान पॅक करा. आपल्याला फ्लाइटमध्ये आपल्या सोबत केबिन बॅग घेऊन जाण्याची सुविधा मिळते. प्रवासादरम्यान लागणाऱ्या वस्तू या बॅगमध्ये ठेवा. जसे कीआपली महत्त्वाची कागदपत्रे, औषध, ऋतूनुसार कपडे, खाण्यापिण्याच्या काही आवश्यक वस्तू इ आपल्या जवळ बाळगा. कारण  आपली मोठी बॅग एअरलाइन काउंटरवरच जमा केली जाते.
 
3 विमानतळावर चेक इन कसे करावे- जर आपण पहिल्यांदा प्रवास करत असाल, तर आपल्याला कदाचित काय करावे, फ्लाइट कशी शोधावी हे समजत नाही. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम तिकीट हातात घ्या आणि चेक-इन काउंटरवर जा आणि तिकीट दाखवा आणि नंतर बोर्डिंग पास घ्या. त्यानंतर मालाचे वजन करा. त्यानंतर मेटल डिटेक्टर मशीनमधून जावे लागेल. या दरम्यान, बोर्डिंग पास वगळता सर्व सामान ट्रेमध्ये ठेवा. फ्लाइटची घोषणा ऐका.  तिकिटावर दिलेल्या टर्मिनलवरून फ्लाइट एंटर करा. कोणताही गोंधळ झाल्यास, न डगमगता, विमानतळ कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकता.
 
4 विमानात गेल्यावर काय करावे-  आपण फ्लाइटमध्ये प्रवेश करता तेव्हा तिकिटानुसार आपल्याला नियुक्त केलेली सीट शोधा. आपल्याला सीट शोधण्यात अडचण येत असल्यास, न घाबरता फ्लाइट अटेंडंटला मदतीसाठी विचारा. आपण आपले सामान म्हणजेच केबिन बॅग सीटच्या वरच्या शेल्फमध्ये ठेवू शकता. फोन फ्लाइट मोडवर ठेवा किंवा तो बंद करा. फ्लाइट स्टाफच्या सूचना काळजीपूर्वक ऐका.
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments