Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलेशियातील तांजुंग बिदारा अनोखा समुद्र किनारा

Webdunia
शनिवार, 10 जुलै 2021 (23:50 IST)
तांजुंग बिदारा हे मलेशियातील मलक्काचा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे जो पर्यटकांप्रमाणेच स्थानिक लोकांचाही अतिशय आवडता आहे. या समुद्र किनार्‍यावर काही उपहारगृहही आहेत. ज्यात असलेल्या स्पामध्ये आपण आपला थकवा दूर करू शकतो. इथल्या एका उपहारगृहाबाहेर एक संगीतमय कारंजाही आहे. संगीताच्या तालावर नाचणार्‍या या कारंजाच्या जलधारा पाहून मन प्रसन्न होतं.
 
मलक्कात खाडीच्या काठावर एक नवीन बोटर फ्रंट तयार केला जात आहे. येथे 12 कोटी रुपये खर्च करून एक अत्याधुनिक भंव्य मशीद बनवली आहे. तिचं नाव आहे, मशीद सेलात मलक्का. येथे कापांग क्लिंग नावाची एक जुनी मशीदही आहे. जी इ.स. 1748 मध्ये बांधली गे आहे. दुरून पाहता ही एखाद्या चिनी पैगोडाप्रमाणे भासते. मलक्काचं आणखी एक प्रमुख आकर्षक म्हणजे एअर केरोह पार्क.
 
ज्यात छोटा मल‍ेशिया बनलेला आहे. यात आपल्याला या देशाच्या सर्व 13 राज्यातील वेगवेगळ्या पद्धतीची घरं पहायला मिळतात. लघू मलेशियाच्या जवळच मलक्काची प्रसिद्ध फुलपाखरांची बाग आहे. आय ऑफ मलक्का सुद्ध या शहराचं प्रमुख आकर्षण आहे. हे जगातील सर्वात उंच चक्र आहे. या चक्रातून बारा मिनिटं वरखाली फिरताना मलक्का शहराचं मनमोहन दर्शन होतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

Saif Ali Khan: साऊथच्या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान दिसणार

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

पुढील लेख
Show comments