Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्यांचे स्कोअरकार्ड

वेबदुनिया
बुधवार, 23 डिसेंबर 2009 (17:12 IST)
अक्षय कुमार (चांदनी चौक टू चायना, एट बाय टेन तस्वीर, कम्बख्त इश्क, ब्ल्यू, दे दना दन)
- अक्षय कुमार यंदा फ्लॉप ठरला नाही, पण त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले. हे चित्रपट झळकले त्यावेळी सुरवातीचे चार दिवस अक्षय कुमारच्या नावावर गर्दी नक्कीच झाली. पण चित्रपटांतच दम नसल्याने ती चटकन ओसरली. त्यामुळे यंदा अक्कीच्या नावावर फ्लॉप चित्रपटांची रास लागली आहे. यातून अक्षय काही शिकेल आणि आपली 'किंमत' कमी करून योग्य तेच चित्रपट निवडेल ही अपेक्षा बाळगूया.

सलमान खान ( वॉंटेड, मै और मिसेस खन्ना, लंडन ड्रिम्स) -
वॉंटेड यशस्वी झाल्याने सलमानचे बॉलीवूडमधले वजन कायम राहिले. लंडन ड्रिम्स फ्लॉप झाला. मै और मिसेस खन्ना फार वाईट पद्धतीने पडला. 'दस का दम' च्या माध्यमातून सलमान सतत दिसत राहिला.

अभिषेक बच्चन ( पा, दिल्ली ६, लक बाय चान्स)
अभिषेकच्या यशाची सरासरी १-१ अशी राहिली. पा यशस्वी झाला पण त्यात त्याच्यापेक्षा त्याच्या 'पा' चा वाटा आहे, हे कुणीही मान्य करेल. स्वबळावर चित्रपट चालविण्याइतका अभिषेक अजून 'ग्रेट' झालेला नाही. 'दिल्ली ६' हे त्याचे उदाहरण.

सैफ अली खान ( लव्ह आज कल, कुर्बान)
लव्ह आज कल हिट झाल्यानंतर हवेत गेलेला सैफ 'कुर्बान'ने आपटी खाल्ल्यानंतर जमिनीवर आला. तरीही हे वर्ष त्याला ठीक गेले असे म्हणता येईल. निर्माता म्हणून त्याचा पहिलाच चित्रपट हिट ठरला.

अमिताभ बच्चन ( पा, अल्लादिन, दिल्ली ६)
बिग बी यंदा 'बिग बॉस'च्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळले. अल्लादिनमध्ये ते राक्षस झाले, पण चित्रपटाला वाचवू शकले नाहीत. पा मध्ये अप्रतिम कामगिरी करत 'अभिनयाचा शहेनशहा' आपल्याला का म्हणतात ते दाखवून दिले.

जॉन अब्राहम (न्यूयॉर्क)
न्यूयॉर्कद्वारे जॉन अब्राहमने आपण चांगला अभिनेता असल्याचे दाखवून दिले. त्याचा त्याला तसे चित्रपट मिळण्यात फायदा झाला आहे. पुढच्या काळात हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर जॉनचे मुल्यमापन करता येईल.

अजय देवगण (ऑल दी बेस्ट, लंडन ड्रिम्स)
अजय मोजक्याच लोकांसोबत काम करतो. त्यांच्यासोबत काम करणेच त्याला आवडते. यंदा ऑल दी बेस्ट हा बर्‍यापैकी मनोरंजन करणारा हिट चित्रपट त्याने दिला. लंडन ड्रिम्समधील अभिनयाचे कौतुक झाले, पण चित्रपट पडला.

रणबीर कपू र ( वेक अप सिड, अजब प्रेम की गजब कहानी, रॉकेट सिं ह)
रणबीर कपूरचे बॉलीवूडमधील वजन या वर्षी चांगलेच वाढले. त्याच्या प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटातील अभिनयाची प्रशंसा झाली. तिनही चित्रपटातली त्याची भूमिका वेगळी होती. अजब प्रेम की गजब कहानी हिट ठरला.

शाहिद कपूर (कमीने, दिल बोले हडिप्पा)
कमीने यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही, पण त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. शाहिदमुळे कमीनेला ओपनिंग चांगले मिळाले. दिल बोले हडिप्पा हा राणी मुखर्जीबरोबरचा चित्रपट फ्लॉप ठरला.

शाहरूख खा न ( बिल्लू)
या वर्षी शाहरूखचा नायक म्हणून एकही चित्रपट रिलीज झाला नाही. खांद्याच्या सर्जरीमुळे आणि पाठीच्या दुखण्यामुळे बॉलीवूडचा हा बादशहा चित्रपटांपासून लांब राहिला. पण चर्चेपासून नाही. सलमान, तर कधी आमिर यांच्या निमित्ताने शाहरूख चर्चेत राहिला. नाईट रायडर्स या त्याच्या संघाचे अपयशही नजरेत आले. अमेरिकेत एअरपोर्ट चेकिंगमध्ये त्याच्याबाबत झालेल्या गैरवर्तनानेही शाहरूखची चर्चा झाली.

इमरान हाशमी (राज, तुम मिले)
इमरान हाशमी म्हणजे विशेष फिल्म्सचा नायक अशी प्रतिमा तयार झाली आहे. ती त्याला त्रासदायक ठरेल. या वर्षी त्याला राज यशस्वी झाला, पण तुम मिले आपटला.

इमरान खान ( लक)
रणबीरच्या तुलनेत इमरान खान मागे पडला. त्याचा लक हा चित्रपट फालतू होता. त्यात अभिनयही चांगला नव्हता. आता मामू आमिरकडून त्याने काही तरी शिकायला हवे.

नील नितिन मुकेश ( आ देखे जरा, न्यूयॉर्क, जेल)
नीलसाठी हे वर्ष संमिश्र होते. न्यूयॉर्क यशस्वी ठरला. पण बाकीचे दोन पडले. आता त्याने अभिनयात सुधारणा करायला हवी.
सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

शांत आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ बडा बाग जैसलमेर

अल्लू अर्जुन यांना संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात नियमित जामीन मिळाला

पुष्पा 2' चेंगराचेंगरी प्रकरणावर बोनी कपूरची प्रतिक्रिया, म्हणाले-

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास

Show comments