Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नानाच्या फोनमुळे मल्हार हैराण?

Webdunia
सेलिब्रिटींची कोणतीच गोष्ट सोशल मीडियावर खासगी राहात नाही. याचा प्रत्यय पाटेकर कुटुंबीयांनादेखील आला आहे. नाना पाटेकर यांचा फोननंबर समजून एक नंबर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि याचा त्रास दुसर्‍या कोणाला नाही तर स्वत: मल्हार पाटेकरला झाला आहे. नाना पाटेकर यांचा फोननंबर म्हणून लोक मल्हारला फोन करु लागले आहेत.
 
मराठी कलाकाराने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणार्‍या कलाकारांमधील एक कलाकार म्हणजे नाना पाटेकर. नानांचा मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्ये एक वेगळा चाहता वर्ग आहे. तसेच नाम फाउंडेशनमुळे नानांच्या चाहत्यांमध्ये आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणार्‍या व्यक्तींमध्ये भर पडला आहे. आणि याच सगळ्याचा त्रास आता मल्हार पाटेकरला झाला आहे. मात्र आपण मल्हार पाटेकरलादेखील अनेकवेळा पाहिले आहे. तो खूप शांतपणे आणि सौम्यपणे आपल्याला उत्तर देतो. तसेच त्याने या गोष्टीला सांभाळले आहे. त्यामुळेच शेवटी मल्हारने कंटाळून आपण नानासाहेब नसल्याचा खुलासा फेसबुकवर केला. एक फेसबुक पोस्ट मल्हारने केले असून त्यात म्हटले की, मी नानासाहेब नसून त्यांचा मुलगा आहे. एक मोबाइल क्रमांक व्हायरल झाला आहे. पण हरकत नाही. तुम्ही सर्व आमचे कुटुंब आहात. मल्हार हा नाना आणि नीलकांती पाटेकर यांचा मुलगा आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments