Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा संसारात रमायचंय झीनतला

Webdunia
शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (15:29 IST)
सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान हिनं आपल्याला पुन्हा एकदा संसारात रमायला आवडेल, असं नुकतंच स्पष्ट केलंय. 19 नोव्हेंबर रोजी झीनत 63 वर्षाची झालीय. 
 
एका ऑनलाईन पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, झीनतनं पुन्हा एकदा लग्न करायचं असल्याचं म्हटलंय. ‘होय मला पुन्हा एकदा लग्न करायचंय.. माझी दोन्हीही मुलं आता मोठी झाली आहेत.. त्यांच्याबद्दल आता मी निश्चित झालेय.. त्यामुळे आता मला स्वत:बद्दल विचार करण्याचा अधिकार आहे’ असं झीनतनं म्हटलंय. 
 
झीनतनं 1985 मध्ये अभिनेता मजहर खानसोबत लग्न केलं होतं. 1998 साली मजहरचं निधन झालं. पण, मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, असंही झीनतनं स्पष्ट केलंय. 
 
चांगल्या भूमिकाच मिळत नसल्यानं आपण सिनेमांमधून बाहेर असल्याचं झीनतनं म्हटलंय. झीनतनं 70 आणि 80 च्या दशकातील काळ आपल्या बोल्ड भूमिकांद्वारे गाजवलाय. 
 
ती हरे रामा हरे कृष्णा, यादों की बारात, डॉन, कुर्बानी, लावारिस आणि दोस्ताना यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आली होती.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments