Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियांकाला व्हाईट हाऊसचे निमंत्रण

Webdunia
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा अमेरिकेत चांगलाच बोलबाला झाला आहे. ऑस्करसाठीचे निमंत्रण, विविध मासिकांच्या कव्हरसाठी फोटोशूटनंतर प्रियांकाला आता थेट व्हाईटहाऊसमध्ये डिनरचे निमंत्रण आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी आयोजित केलेल्या पार्टीसाठी तिला निमंत्रित करण्यात आले आहे. प्रियांका सध्या विविध प्रोजेक्टमध्ये गुंतलेली आहे. व्हॉईट हॉउसचे निमंत्रण तिने स्वीकारले आहे का नाही, याबद्दलची माहिती मिळालेली नाही. 
 
प्रियांका चोप्राला बेवॉच या सिनेमात महत्त्वाची भूमिका मिळाली आहे, शिवाय ती ‘कॉन्टिको’ या टीव्ही मालिकेसाठीही ती काम करत आहे. प्रियांकाला ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. शिवाय तिला कॉन्टिकोतील भूमिकेसाठी विविध पुरस्कारही मिळाले आहेत. त्यानंतर तिला व्हॉईट हाऊसमध्ये निमंत्रणाचा मान मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दरवर्षी माध्यमांचे प्रतिनिधी आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या नामवंत व्यक्तींसोबत डीनरचा कार्यक्रम ठेवतात. ओबामा यांच्या कारकिर्दीतील हे शेवटचे ‘करस्पाँडन्स डीनर’ असणार आहे. त्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून त्यात प्रियांकाचाही समावेश आहे. प्रियांकाच्या सोबत बाडर्ली कूपर, लुसी लियू, जेन फोंडा, ग्लॅडीज नाईटस यांचाही निमंत्रितांत समावेश आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments