Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी अजून एंगेज्ड नाही

Webdunia
सोमवार, 17 नोव्हेंबर 2014 (14:38 IST)
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या रिलेशनशिपबद्दल जोरदार चर्चा रंगत असताना अनुष्काने मोठा खुलासा केला आहे. साखरपुडय़ाबाबतच्या चर्चाना अनुष्का शर्मा कंटाळली आहे. त्यामुळे तिने स्वत:च चाहत्यांशी संवाद साधून स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या आणि विराट कोहलीच्या जवळकीचं वृत्त येत आहे. शिवाय दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र अनुष्का शर्माने या मुद्दय़ावर फेसबुकवर थेट तिच्या चाहत्यांशी चॅट केलं. व्हीडीओ चॅटमध्ये तिने म्हटलं आहे की, मी अजून एंगेज्ड नाही. सध्या माझा साखरपुडाही होणार नाही. माझ्याबाबत अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, ज्यामध्ये थोडंही तथ्य नाही. मी नेहमीच मीडियाशी याबाबत बोलू शकत नाही, त्यामुळे मी थेट चाहत्यांशी संवाद साधत आहे. मी माझ्या कामात खूश आहे आणि सध्या कामावरच लक्ष केंद्रित करायचं आहे. अनुष्का सध्या आमिर खानसह तिचा आगामी सिनेमा ‘पीके’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

Show comments