Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्या पुन्हा छोट्या पडद्याकडे

Webdunia
मंगळवार, 9 जून 2015 (10:39 IST)
लहान पडद्यावर सध्या स्वच्छतेचा संदेश देत असलेल्या विद्या बालनने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शोमधून केली होती. 10 वर्षे छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर तिने ‘परिणिता’द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘हम पांच’ हिट झाल्यानंतर टीव्ही कार्यक्रमांचे दिग्दर्शन करणार्‍या अनुराग बसूने तिला एका डेली सोपची ऑफर दिली. मात्र चित्रपटाकडे वळलेल्या विद्याने पुन्हा छोट्या पडद्यावर येण्यास नकार दिला आणि चित्रपट सृष्टीतील तिची आगेकूच चालू राहिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, विद्याला बर्‍याच दिवसांपासून टीव्ही चॅनलवरील शोसाठी प्रस्ताव येत होते. मात्र विद्या एका दमदार शोच्या प्रतीक्षेत होती. सध्या तिला आलेल्या शोच्या प्रस्तावाचा कंटेट आवडला असून त्यासाठी तिने सध्या एकही चित्रपट साइन केला नाही. ‘हमारी अधुरी कहानी’ नंतर आगामी चित्रपट कोणता? यावर ती म्हणते की, ‘मलाच माहीत नाही की माझा आगामी चित्रपट कोणता असेल? कदाचित माझा पुढचा प्रोजेक्ट हा टीव्ही शो देखील असू शकतो.’

टीव्ही शोबाबत बोलताना विद्या म्हणाली की, ‘मला एका चॅनलच्या शोचा प्रस्ताव आला आहे. जर या शोची थीम मला आवडली तर मी हा शो करण्यास प्राधान्य देईन. या शोसाठी मला 4-5 महिन्यांचा वेळ द्यावा लागेल. या कालावधीत मी चित्रपटाची शूटिंग करू शकणार नाही त्यामुळे मी सध्या सर्व चित्रपटांचे प्रस्ताव रोखले आहेत.’
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments