Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शौकीनमधून यामीची माघार

Webdunia
सोमवार, 17 मार्च 2014 (23:21 IST)
‘शौकीन’चित्रपटातून नर्गिस फाखरीचा पत्ता कट झाल्यानंतर यामी गौतमला या चित्रपटात संधी मिळणार होती. मात्र, सूत्रांच्या मते आता यामीलादेखील हा चित्रपट सोडावा लागणार आहे. या चित्रपटासाठी तिच्या लूकची चाचणीदेखील झाली होती. खरे तर, दिग्दर्शक अभिषेक शर्मा अभिनेत्रीची भूमिका थोडय़ाशा हॉट पद्धतीने सादर करू इच्छितात. तसेच चित्रपटाची कथादेखील याच अनुषंगाने आहे. यामीची चाचणी झाल्यानंतर तिच्यामध्ये बोल्ड एलिमेंटचा अभाव दिसून आला. यामुळे यामीला चित्रपट सोडावा लागला. आता चित्रपटातील या बोल्ड भूमिकेसाठी श्रद्धा कपूरचे नाव पुढे आल्याचे वृत्त आहे. ‘आशिकी 2’मध्ये साध्या-भोळ्या मुलीची भूमिका साकारलेल्या आरोहीकडून हॉट भूमिका साकारण्याबाबत कल्पनादेखील केली जाऊ शकत नाही. मात्र, ‘द विलेन’चित्रपटात श्रद्धाच्या लूकबाबत अनेक प्रयोग करण्यात आले असून तिला एका नव्या रूपात सादर केले जाणार आहे. या कारणामुळेच ‘शौकीन’चित्रपटाच्या निर्मात्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले आहे. लवकरच तिच्या लूकची चाचणी घेऊन तिच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

Show comments