Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रुतीचे पुन्हा ब्रेकअप

Webdunia
सोमवार, 21 एप्रिल 2014 (14:12 IST)
दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सातत्याने सक्रिय असलेली श्रुती हसन आतापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवू शकली नाही. तरीदेखील ती नेहमीच चर्चेत असते. खासगी आयुष्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना श्रुती कधीच उत्तर देत नाही. सूत्रांच्या मते, तिचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. काही दिवसांपासून ती युवा स्टार नाग चैतन्यशी डेट करत होती. नाग हिंदी आणि दक्षिण भारतीय अभिनेता नागाजरुनचा मुलगा आहे. श्रुती व नाग यांच्या अफेअरची चर्चा सुरुवातीला गुलदस्त्यात होती. मात्र, दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर याची चर्चा व्हायला लागली. नाग यापूर्वी साऊथ स्टार अनुष्कासोबत डेट करत होता. श्रुती हसनचे नावदेखील यापूर्वी क्रिकेटर सुरेश रैनापासून ते रजनीकांतचा जावई धनुषसोबत जोडण्यात आले होते. कथितरीत्या ‘रांझणा’ चित्रपटादरम्यान हे प्रेमप्रकरण सुरू होते. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत धनुष आला होता, पण पत्नी ऐश्वर्या काही कारणांमुळे येऊ शकली नसल्याचे स्पष्टीकरणही त्याने दिले. त्यानंतर मात्र धनुष आणि श्रुतीचे मार्ग वेगळे झाले होते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments