Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रुती पुन्हा तामिळी चित्रपटात

Webdunia
मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (12:20 IST)
श्रुती हासन गेल्या दोन वर्षांपासून तामिळी चित्रपटांपासून दूर होती. आता आगामी 'पूजै' या चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एकदा तामिळी चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. ती 2012 मध्ये 'थ्री' आणी '7 एएम अरिवू' या तामिळी चित्रपटांमध्ये दिसली होती. या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नव्हते.

येथील एका कार्यक्रमावेळी श्रुतीने सांगितले, 'पूजै' मध्ये काम करीत असताना मला आनंद वाटला. तामिळी चित्रपट व्यवसायात पुन्हा परत आल्याने मी खूश आहे. अर्थात मला कोणत्याही एका विशिष्ट भाषिक चित्रपटांमध्ये स्वत:ला बांधून घेण्याची इच्छा नाही. मी एका बहुसांस्कृतिक कुटुंबातून आलेली आहे आणि भारतिय चित्रपटांशी निगडीत आहे. सर्व भाषामंधील चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे. श्रुती ही तामिळी पिता आणि मराठी आईची कन्या आहे. कमल हासन व सारिका (ठाकूर) यांची थोरली कन्या असलेल्या श्रुतीला हिंदीत मात्र अद्याप मोठे यश मिळालेले नाही. दक्षिण भारतात मात्र ती एक अभिनेत्री व गायिका म्हणूनही ओळखली जाते.   



अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

Show comments