Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हर्शाली झळकली आहे अनेक मालिका आणि जाहिरातीत

Webdunia
सोमवार, 22 जून 2015 (11:10 IST)
सलमान खान आणि करिना कपूर स्टारर ‘बजरंगी भाईजान’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमामध्ये दोनही स्टार्सशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीसुध्दा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. परंतु सर्वात खास भूमिका बालकलाकार हर्शाली मल्होत्राची आहे.

छोटय़ा पडद्यावर ‘कबूल है’, ‘सावधान इंडिया’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘जोधा अकबर’सारख्या मालिकांमध्ये झळकलेली हर्शाली पहिल्यांदा मोठय़ा पडद्यावर काम करत आहे. कबीर खानला सिनेमासाठी एका गोंडस चेहर्‍याचा शोध होता. त्यासाठी त्यांनी तब्बल 1000 मुलांचे ऑडिशन घेतले. त्यात त्यांनी हर्शालीला निवडले.

हर्शाली सिनेमात एक पाकिस्तानी मुलगी मुन्नीच्या पात्रात आहे. ती हरवते आणि भारतात पोहोचते. बजरंगी अर्थातच सलमान खान त्या मुलीला पाकिस्तानमध्ये अर्थातच तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी उचलतो. परंतु व्हिसा आणि पासपोर्टच्या भानगडीत अटकतो. सलमान आपली जबाबदारी पूर्ण करतो, की नाही हे जाणून घेण्यासाठी सिनेमा रिलीज होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सलमान खानला ट्रेलर रिलीजदरम्यान हर्शालीविषयी विचारल्यानंतर त्याने सांगितले, ‘खूप सुंदर आणि शानदार अँक्ट्रेस आहे. परंतु सेटवर थोडेफार नखरे करते, पण लहान मुलगी आहे म्हणून चालते. मीसुध्दा बालपणी असेच नखरे करत होतो.’

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

Show comments