Festival Posters

रणवीरने खरेदी केले घर

Webdunia
शुक्रवार, 26 जून 2015 (11:02 IST)
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने वांद्रयातील त्याचे आईवडीलांचे घर सोडले असून तो आता गोरेगावला शिफ्ट झाला आहे. गोरेगावमध्ये रणवीरने स्वत:चा फ्लॅट खरेदी केला आहे. खरं तर रणवीर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमासाठी गोरेगाव येथे शिफ्ट झाला आहे. 
 
त्याचे कारण म्हणजे अलीकडेच रणवीरच्या खांद्याची सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी त्याला हळू चालणे आणि अँक्शन सीन्स न करण्याचा सल्ला दिला आहे. शेड्यूलला उशीर होऊ नये यासाठी रणवीरने सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तो आता 12 तास शूटिंग आणि चार तास फिजिओथेरपी करणार आहे. हे सर्व सांभाळणे त्याला कठीण होत आहे. रणवीरच्या वांद्रयास्थित घरापासून गोरेगाव फिल्म सिटी 20 किमी अंतरावर आहे. मात्र पाऊस आणि ट्रॅफिकमुळे हे अंतर कापायला दीड तासांहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे त्याने गोरेगावमध्ये घर घेतले असून फिल्म सिटीपासून ते केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. 
 
‘बाजीराव मस्तानी’मध्ये रणवीरसह दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा मेन लीडमध्ये आहेत. जानेवारी 2016 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कॉमेडियन भारती सिंह वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा गोंडस मुलाची आई झाली

केजीएफचे सह-दिग्दर्शक कीर्तना नाडागौडाच्या 4 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्देवी मृत्यू

ऑस्कर पुरस्कार YouTube वर प्रसारित होणार

आयकर विभागाचा शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटसह अनेक इतर खाद्य कंपन्यांवर छापा

The beauty of Kerala दक्षिण भारतातील ही सुंदर ठिकाणे जिथे अनके चित्रपटांचे चित्रीकरण झाले

Show comments