Marathi Biodata Maker

अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!

Webdunia
शुक्रवार, 13 मार्च 2026 (11:38 IST)
प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस. स्टार प्लसवरील सर्वाधिक लोकप्रिय शो असलेला "अनुपमा" अत्यंत रंजक कथानकामुळे अजूनही टीव्हीवर राज्य करत आहे या मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि भावनिक वळणांमुळे प्रेक्षक या मालिकेशी भावनिक रित्या घट्ट जोडले गेले आहेत. मालिकेतील पात्र आता प्रेक्षकांना आपलीशी वाटायला लागली असून या कारणांमुळे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी या मालिकेला प्रेम दिलं. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये कथानकात लीप दाखवण्यात आला असून अनुपमा आपल्या आयुष्याचा नवा अध्याय गोव्यात सुरू करताना दिसणार आहे.

नवीन प्रोमोमध्ये ती गोव्याच्या बीचवर अनुपमा थेपले आणि ढोकळे विकत आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करताना दिसते. तिच्यासोबत राहणाऱ्या एका छोट्या मुलीसोबत तिचे जिव्हाळ्याचे नातेही या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल असून या प्रोमोमध्ये सचिन त्यागी यांच्या नव्या एन्ट्रीची झलकही पाहायला मिळते जे अनुपमाच्या पुढील प्रवासात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

अनुपमाची महत्त्वपूर्ण आणि प्रेक्षकांना भावणारी भूमिका साकारणाऱ्या रुपाली गांगुली यांनी अनुपमाच्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले "अनुपमा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. ती एक अशी स्त्री आहे जी आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरी जात पण तरीही ती ठामपणे उभी राहून पुन्हा नव्याने उभी राहण्याची ताकद दाखवून देते. अनुपमाच्या वेगवेगळ्या प्रवासांमधून अनेक महिलांच्या आयुष्यातील अनुभव आणि संघर्ष प्रतिबिंबित होतात कारण प्रत्येक स्त्रीचा प्रवास वेगळा असतो. काही स्त्रियांना अनुपमाच्या आधीच्या टप्प्यातील प्रवास हा आपलासा वाटला तर काहींना पुढे येणारा प्रवास आपला आहे काही असं देखील वाटून जाईल. या सगळ्यात अनुपमाची जिद्द सशक्तपणे उभ राहण्याची ताकद आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःची किंमत कधीही न विसरण्याचा तिचा स्वभाव हा कौतुकास्पद आहे"

लीप आणि नव्या ट्विस्टबाबत बोलताना रुपाली गांगुली म्हणाल्या "प्रार्थनाच्या मृत्यूनंतर आता लीपनंतर अनुपमा गोव्यात आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करते. तिथे ती देविकाच्या मुलीसोबत राहत आहे आणि नव्या भावना व जबाबदाऱ्यांचा सामना करत आहे. त्यासोबतच एक नवी एन्ट्री आणि अनेक अनपेक्षित ट्विस्ट पुढे येणार आहेत या सगळ्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि त्यामुळे आगामी ट्रॅकमध्ये प्रेक्षकांना खूप आवडतील असे अनेक क्षण पाहायला मिळतील अशी आमची आशा आहे"
ALSO READ: अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित
लीपनंतर अनुपमाचा नवा प्रवास कसा उलगडणार ? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गोव्यातील नवी सुरुवात आणि सचिन त्यागी यांच्या एन्ट्रीमुळे अनुपमाची कथा पुढे काय वळण घेते आणि ती प्रेक्षकांना कशी प्रेरणा देणारी ठरते हे पाहण रंजकदार ठरणार आहे.

अनुपमा दररोज रात्री १० वाजता फक्त बघायला विसरू नका फक्त स्टार प्लसवर !
ALSO READ: "धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

दीपिका कक्करच्या सासऱ्यांना ब्रेनस्ट्रोक, रुग्णालयात दाखल

मुंबईच्या गजबजलेल्या माहीम भागात असलेली सर्वात हॉंटेड ठिकाणांपैकी एक ''डिसूझा चाळ''

'है जवानी तो इश्क होना है' चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

पुढील लेख
Show comments