Festival Posters

Aamir Khan चेन्नईच्या पुरात अडकला आमिर खान

Webdunia
बुधवार, 6 डिसेंबर 2023 (11:38 IST)
Twitter
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईला पूरासारखी परिस्थिती आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट आहे, हे 4 डिसेंबरला आलेल्या चक्रीवादळाने सिद्ध केले आहे. शहरात मुसळधार पावसामुळे बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान अडकला. शहरात पाणी साचल्याने पाणी, वीज आणि खराब फोन सिग्नल या समस्यांशी आमीर खान तब्बल 24 तास झगडत होता.
 
बचाव पथक येण्यापूर्वी आमिर खान शहरातील करप्पाकम परिसरात 24 तास अडकून पडला होता. अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडियाच्या माध्यमातून अडकल्याची माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार कॉलिवूड अभिनेता विष्णू विशालसोबत त्याच्या करप्पाकम येथील घरी थांबला होता. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमिर खान सेलिब्रिटी कपल विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टासोबत दिसत आहे
 
आमिर खान गेल्या काही महिन्यांपासून चेन्नईमध्ये राहत असून तेथे त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत. कामाबद्दल बोलायचे झाले तर, आमिर खान लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'सितारा जमीन पर' वर काम करण्यास सुरुवात करणार आहे. अभिनेत्याने अलीकडेच सांगितले की त्याच्या पुढच्या चित्रपटाची थीम 'तारे जमीन पर' सारखीच आहे. आमिर खानचा यापूर्वीचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट खूप फ्लॉप झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रणवीर सिंगच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

देसी गर्ल प्रियांका चोप्राने पांढऱ्या लेहेंग्यात आकर्षक शैलीत पोज दिली

राम माधवानी यांच्या आध्यात्मिक अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये टायगर श्रॉफ दिसणार वेगळ्या अवतारात

४३ वर्षीय दक्षिणेतील अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घेतला घटस्फोट

रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला हे पतीची पत्नी और पंगा सीझन 1 चे विजेते ठरले

सर्व पहा

नवीन

Actor Dharmendra passes away क्रिकेट जगतही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे

अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला

रोनित रॉयने त्याच्या कुटुंबासाठी उचलले मोठे पाऊल, महत्त्वाची माहिती शेअर केली

Dharmendra Facts धर्मेंद्र यांच्याबद्दल ५० तथ्ये जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

पुढील लेख
Show comments