'रसभरी' वेबसीरिजवरून भन्नाट मिम्स व्हायरल

सोमवार, 29 जून 2020 (15:12 IST)
अभिनेत्री स्वरा भास्कर हिची नवीन वेबसीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. 'रसभरी' असे या वेबसीरिजचे नाव असून स्वराने यामध्ये शिक्षिकेची भूमि का साकारली आहे. मात्र ही वेब सीरिज नेटकर्‍यांच्या पसंतीस उतरली नसून अनेकांनी तिला ट्रोल केले. यावरून बरेच मिम्ससुद्धा व्हायरल होत आहेत.

काहींनी या वेब सीरिजला फ्लॉप म्हटले तर काहींनी थेट यानंतर अ‍ॅमेझॉनचे सबस्क्रीप्शन बंद करणार असल्याचे म्हटले. 'ही सीरिज बी ग्रेड आणि सी ग्रेड चित्रपटांच्या तुलनेतही वाईट आहे', अशा शब्दांत एका नेटकर्‍याने टीका केली. शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती या वेबसीरिजची कथा फिरते. विशिष्ट वयोगटात तरुणांच्या मनात स्त्रियांविषयी येणार्या विचारांवर उपहासात्क पद्धतीने यात भाष्य करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख कोणीच पाठिंबा देत नाही म्हणून करण जोहरने घेतला ‘हा’ निर्णय