Marathi Biodata Maker

अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास लावून केली आत्महत्या

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2022 (20:51 IST)
मुंबई येथे अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. यासंदर्भात वालीव पोलिसांनी माहिती दिली आहे. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती,  इतके मोठे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही.
 
रामदेव स्टुडिओच्या बाथरूम मध्ये अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी नायगावच्या गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अलिबाबा दास्ताने काबुल या मालिकेत सोनी सब चॅनेलवरील मुख्य अभिनेत्री म्हणून ती काम करत होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ती शनिवारी मालिकेच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. त्यानंतर तिच्या सहकारी तिला बोलावण्यासाठी गेल्या. त्यांनी दरवाजा ठोठावला. पण तिने दरवाजा न उघडल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे पाहून सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. तिला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले पण तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिचे कोणत्या अभिनेत्यासोबत अफेअर किंवा काही वाद झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. पण, तिने आत्महत्या का केली व कोणत्या कारणामुळे याचा नालासोपारा येथील वालीव पोलीस तपास करत असल्याचे उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले.या बाबत दैनिक लोकमत ने अधिकृत वृत्त दिले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धुरंधर' चित्रपटातील संजय दत्तचा पहिला लूक प्रदर्शित, या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर येणार

विवाहित चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडली समांथा रूथ प्रभू, नाते इंस्टाग्रामवर अधिकृत केले!

श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुला 23 वर्षांनंतर इंडियन आयडॉल मध्ये एकत्र गाणे गायले

सुपरस्टार रजनीकांत यांना IFFI 2025 मध्ये विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार

साखरपुड्यानंतर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न चर्चेत; कधी आणि कुठे करणार जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायक टॉड स्नायडर यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज, कुटुंबीयांनी दिले आरोग्य अपडेट

विंध्य पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले पुरातत्वीय वैभवाचे उल्लेखनीय उदाहरण भीमबेटका रॉक शेल्टर्स

बिग बॉस 11' फेम प्रियांक शर्माच्या वडिलांचे निधन

अभिनेता राजकुमार राव गोंडस मुलीचे बाबा झाले

पुढील लेख
Show comments