Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीपीई किट घालून ‘या’अभिनेत्रीनं केला विमानप्रवास

Webdunia
शुक्रवार, 12 जून 2020 (16:30 IST)
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु होता. मात्र काही दिवसापूर्वीच ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील विस्कटलेली घडी हळूहळू सुरळीत होताना दिसत आहे. यामध्येच आता मुंबईकरही त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडू लागले असून सेलिब्रिटींदेखील बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. यात एका अभिनेत्रीने पीपीई किट (PPE Suit)घालून विमानप्रवास केल्याचं समोर आलं आहे. सध्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media)चर्चिला जात आहे.
 
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (rakul preet singh)हे नाव कलाविश्वासाठी आणि चाहत्यांसाठी नवीन नाही. याच रकुल प्रीतने पीपीई किट घालून विमानप्रवास केल्याचं समोर आलं आहे. अलिकडेच रकुलला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. यावेळी तिने पीपीई किट आणि चेहऱ्यावर मास्क लावलं होतं. विशेष म्हणजे या गेटअपमध्ये तिला कोणी ओळखणार नाही असं तिला वाटलं होतं. मात्र छायाचित्रकारांनी तिला पाहताच क्षणी ओळखलं आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली.
 
विमानतळाच्या आत प्रवेश करण्यासाठी रकुलप्रीत गाडीतून उतरल्यानंतर तिची छबी कॅमेरात कैद करण्यासाठी अनेक छायाचित्रकार पुढे सरसावले आणि त्यांनी रकुलला पोझ (rakul preet singh)देण्यास सांगितलं. मात्र ही बाब रकुलला फारशी रुचली नाही. ‘काय इकडे पाहा? कृपा करुन हे सारं करु नका’, असं रकुलप्रीत म्हणाली.
 
 दरम्यान, रकुलप्रीत ‘दे दे प्यार दे’या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केली होती. तसंच रकुल आणि अजय देवगणसह या चित्रपटात अभिनेत्री तब्बूदेखील झळकली होती.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments