rashifal-2026

कलाकारांच्या यशावर ठरते मानधन

Webdunia
गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (19:32 IST)
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे बर्‍याच वर्षांनंतर रुपेरी पडावर एकत्र झळकणार आहेत. ते दोघेही तब्बल आठ वर्षांनंतर गुलाबजामू सिनेमात दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला देखील सुरूवात केली आहे. या निमितताने नुकतीच एका वाहिनीला अभिषेकने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणार्‍या मानधनाबद्दल आपले मत मांडले. अभिषेक बच्चनने मानधनाबद्दल सांगताना तो मानधनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहात असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, महिला अभिनेत्रींना अभिनेत्याच्या तुलनेत कमी मानधन मिळते. यावरून अनेकदा वाद होतात. पण मी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. मी आणि ऐश्वर्या नऊ चित्रपटात काम केले. त्यापैकी आठ चित्रपटात माझ्यापेक्षाही अधिक मानधन हे ऐश्वर्याला मिळाले होते. पिकूमध्ये सर्वाधिक मानधन मिळालेली व्यक्ती दीपिका पदुकोण होती. बॉलिवूडमध्ये कलाकार किती यशस्वी आहे यावरुन त्याचे मानधन ठरते. जर नवोदित कलाकार शाहरुखइतकेच मानधन मागत असेल तर त्याला ते कसे मिळणार? ऐश्र्वर्या आणि अभिषेक ही जोडी अनुराग बसूच्या गुलाबजामून चित्रपटातून रुपेरी पडावर झळकणार असून त्यांची केमेस्ट्रिी पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघांचे चाहते त्यांना एकत्र स्क्रीनवर पाहाण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Year Ender 2025: 2025 मध्ये हे सेलिब्रिटी पालक झाले

क्यूंकी सास भी कभी बहू थी 2: तुळशी मिहिरपासून वेगळी झाली, नवीन जीवन सुरू केले

धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाची पहिली पसंती होती, आदित्य धरने तिला का नाकारले?

नोरा फतेहीच्या कारला अपघात, मद्यधुंद चालकाने वाहनाला धडक दिली

धुरंधर' 500 कोटी क्लबमध्ये सामील, 16व्या दिवशी शाहरुख खानचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments