suvichar

अजय देवगण बनणार चाणक्य

Webdunia
आतापर्यंत हरतर्‍हेच्या भूकिासाकारणार्‍या अजय देवगणला आता आई चाणक्यच्या रोलध्ये बघण्याची संधी आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेनेंट आणि फ्रायडे फिल वर्क्सची कंपनी प्लॅन सी स्टुडिओजने आर्य चाणक्यवरच्या सिनेमासाठी अजय देवगणची निवड निश्चित केली आहे. निरज पांडेच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार होणार आहे. राजकीय रणनितीकार, कुशल प्रशासन तज्ञ आणि अर्थतज्ञ असलेल्या या सिनेमामध्ये चाणक्यच्या कुशल राजकारण्यासाठीच्या शिकवणूकीवर विशेष भर दिलेला असेल. चाणक्य लौकिक अर्थाने योद्धा नव्हता, तर एक शिक्षक होता. आताचे पाटणा अर्थात पाटलीपुत्र राजधानी असलेल्या राज्यावर चंद्रगुप्त मौर्याची सत्ता स्थापन करण्यामध्ये त्याने मोलाची भूमिका बजावलेली होती. आजच्या काळात चाणक्यसारख्या हुशार आणि नितीमान राजकारण्यांची आवश्यकता आहे. त्यामुळेच हा रोल आपण आनंदाने स्वीकारला असल्याचे अजय देवगणने सांगितले. नीरज पांडे गेल्या काही महिन्यांपासून चाणक्यच्या कथेवर काम करत आहे. नीरज पांडेबरोबर अजय देवगणचा हा पहिलाच सिनेमा असेल. दुसरीकडे अजय देवगण नरवीर तानाजीच्या रोलचीही तयारी करत आहे. तानाजीवरील सिनेमाचे प्रोडक्शनही स्वतः अजय देवगणचेच असणार आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर काजोलही असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

ड्रामा, टास्क आणि ट्विस्ट्सचा जल्लोष – बिग बॉस मराठी 6 मधील 5 अविस्मरणीय क्षण!

अक्षय कुमारचा मुलगा आरव वयाच्या २३ व्या वर्षी करत आहे नोकरी; पगार ऐकून धक्का बसेल

कळीचा मुद्दा.. कुटुंबप्रमुख कोण..? नुसतं एव्हढंच विचारलं

चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे, संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

जन नायकन'नंतर आता रजनीकांतचा 'जेलर २' लीक झाला , निर्मात्यांनी चाहत्यांना कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला

पुढील लेख
Show comments