Dharma Sangrah

‘अजय-इलियाना’चा सुफी संगीतावर रोमांस

Webdunia
शनिवार, 15 जुलै 2017 (11:06 IST)
बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याच्या आगामी “बादशाहो’ चित्रपटातील पहिले गाणे “मेरा रश्‍के कमर…’ रिलीज झाले आहे. अजय देवगनने ट्विटरवर त्याचा व्हिडिओ जारी केला आहे. या गाण्यात सुफी संगातीवर अजय देवगनची अभिनेत्री इलियाना डिक्रूज सोबत रोमांटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
 
सुफी संगीताची परंपरा आणि प्रेक्षकांची या गाण्यांना मिळणारी पसंती पाहता श्रोत्यांसाठी आणखी एक पर्वणी ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी सुफीयाना आवाजाने नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचे हे सुरेख रिक्रिएटेड व्हर्जन आहे.
 
अजय देवगण “जुबान और जान सिर्फ एक ही बार दी जा सकती है’, असे म्हणत पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. “मेरे रश्‍के कमर’ या गाण्यात राजेशाही थाट, प्रेम, आर्तता आणि त्यातून या दोघांचे खुलणारे प्रेम या सर्व गोष्टींचा मेळ साधण्यात आला आहे.
 
मनोज मुंतशिर याने हे गाणे लिहिले असून या गाण्यात प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान आणि राहत फतेह अली खान यांच्या आवाजाने “चार चॉंद’ लावत आहेत. या दिवसांमध्ये रिक्रिएटेड व्हर्जन्स चर्चेत असणाऱ्या तनिष्क बागचीने या गाण्याचा मूळ आत्मा जपतच ते सादर केले आहे. “बादशाहो’ चित्रपट ऍक्‍शन थ्रिलर या प्रकारात मोडत असून अजय देवगण, इमरान हाश्‍मी, इलियाना डिक्रूझ, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल हे कलाकार यात झळकणार आहेत. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शीत होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments