rashifal-2026

अक्षय कुामार रचणार 'हा' विक्रम

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (16:28 IST)
सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान या तिघांना मागे टाकत बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षयकुार लवकरच ऐतिहासिक विक्रम रचणार आहे. यावर्षी त्याचे तीनचित्रपट प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. एकंदरीत वर्षभरातील त्याच्या चित्रपटांची कमाई 1000 कोटी रुपयांचा आकडा गाठणार आहे. यावर्षी मार्चमध्ये 'केसरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 203 कोटी रुपये कमावले त्यामुळे अक्षयसाठी वर्षाची सुरुवात दणक्यात झाली. त्यानंतर ' मिशन-मंगल' हा मल्टि-स्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 277 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हे दोन्ही चित्रपट मिळून तब्बल 480 कोटी रुपयांची कमाई अक्षयने केली. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल 4' या कॉमेडी चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळला. केवळ 25 दिवसांत 'हाऊसफुल 4'ने 290 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या तिन्ही चित्रपटांची कमाई 770 कोटींपर्यंत झाली. अक्षयचा 'गुड न्यूज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
दिलेल्या वृत्तानुसार अक्षय लवकरच 1000 कोटींचा पल्ला गाठणार आहे. अक्षयकुमारचा 'गुड न्यूज' हा चित्रपट जवळपास 225 कोटी कमावेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तविला आहे. त्यामुळे वर्षभरात अक्षयची 1000 कोटींची उड्डाणे होण्याची शक्यता आहे. याआकड्यामुळे तो लवकरच सलमानलाही मागे टाकणार आहे. 2016 मध्ये सलमानच्या चित्रपटांची 970 कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्याच्या 'बजरंगी भाईजान' व 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटांना तिकिटबारीवर प्रतिसाद मिळाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

सिद्धार्थ शुक्ला या कारणासाठी वडिलांच्या पर्समधून पैसे चोरायचे

धर्मेंद्रची इच्छा अपूर्ण राहिली, हेमा मालिनी यांनी प्रार्थना सभेत गुपित उलगडले

सिद्धार्थ शुक्लाला अभिनेता व्हायचे नव्हते, पण आईच्या सल्ल्याने त्याचे आयुष्य बदलले

Rajinikanth Birthday रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

पुढील लेख
Show comments