Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

आलिया भट्टला वडीलांसोबत काम करण्यास घाबरते

alia bhatt
, शनिवार, 2 मार्च 2019 (18:38 IST)
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट यांची फिल्म 'गली बॉय' बॉक्स ऑफिसवर चांगला प्रदर्शन करत आहे. या चित्रपटातील आलियाची अभिनय फॅन्सला खूप आवडली. 'गली बॉय' नंतर आलिया भट्ट 'कलंक', 'ब्रह्मास्त्र' आणि तिचे वडील महेश भट्टचे चित्रपट 'सडक 2' या चित्रपटात दिसणार. 
 
आलिया 'सडक 2' मध्ये पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या दिग्दर्शनात काम करणार आहे. बातमी आहे की आपल्या वडिलांच्या दिग्दर्शनात काम करण्यास आलिया घाबरते. आलिया स्वतः देखील म्हणाली की, "सध्या मी माझ्या वडिलांच्या दिग्दर्शनात काम करण्यास घाबरते. सध्या ते सतत माझे काम पाहत आहे आणि म्हणाले की मला तुझ्याशी प्रोफेशनल व्यवहार करावा लागेल. त्यांच्याकडे एक्स-रे दृष्टीसारखे डोळे आहे." 
 
आलिया म्हणाली की मी माझ्या भोवती एक भिंत उभी केली आहे. मी कोणालाही ती पार करू देत नाही. माझे वडील त्या भिंतीचा नाश करण्याची वाट बघत आहे. म्हणून मी थोडी घाबरली आहे, पण चित्रपटात शूटिंगमध्ये खूप मजा येईल. यावर्षी आम्ही 'सडक 2' ची शूटिंग सुरू करणार आहोत. 'सडक 2' चित्रपटात आलिया भट्ट पहिल्यांदाच आपल्या बहिण पूजा भट्टबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर देखील एक महत्त्वाची भूमिका बजावतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'डोक्याला शॉट'चा ग्रँड प्रीमियर सोहळा