Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे निधन

Webdunia
रविवार, 13 ऑगस्ट 2023 (15:43 IST)
अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे शनिवारी (12 ऑगस्ट) निधन झाले. ते अनेक महिन्यांपासून आजारी होते. ते 68 वर्षांचे होते. सध्या तरी त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत. वडिलांच्या अंत्यसंस्कारात अंकिता तिच्या आईची काळजी घेताना दिसली.अंकिताने वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. 
 
अंकिता तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. ती अनेकदा वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असे. रिपोर्ट्सनुसार, अंकिताला तिच्या वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे. रडून अभिनेत्रीची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. अंकिताचे कुटुंब मध्य प्रदेशातील इंदूरचे आहे. त्यांचे वडील व्यवसायाने बँकर होते. 
 
 अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. एकता कपूरने तिला पवित्र रिश्ता या मालिकेत पहिली संधी दिली. या शोमुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली. या शोमधील अर्चना नावाची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. अंकिताने टीव्हीशिवाय अनेक चित्रपटांचाही भाग केला आहे. कंगना राणौतच्या मणिकर्णिका या चित्रपटातही ती दिसली आहे.
 
 



Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा कायदेशीर घटस्फोट झाला

समय रैनाच्या अडचणी वाढल्या, महाराष्ट्र सायबर सेलने कॉमेडियनला दुसरे समन्स पाठवले

शाहरुख खानने या बॉलिवूड अभिनेत्याकडून भाड्याने घेतले अपार्टमेंट

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी

सर्व पहा

नवीन

हिंदुस्थानी भाऊने फराह खान विरुद्ध दाखल केला एफआयआर,हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

शौंकी सरदार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना गुरु रंधावा जखमी

छावा' आणि महाकुंभावरील पोस्टमुळे स्वरा भास्कर अडचणीत, दिले हे स्पष्टीकरण

नागेश्वर मंदिर द्वारका

पूनम पांडेसोबत चाहत्याची असभ्य वर्तणूक, किस करण्याचा प्रयत्न केला

पुढील लेख
Show comments