Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Athiya Shetty KL Rahul Wedding : अथिया आणि राहुलच्या लग्नाची तारीख ठरली, या दिवशी वैवाहिक बंधनात अडकणार

Webdunia
मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (17:13 IST)
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी फार कमी बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे, परंतु ती अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री चर्चेत राहण्याचे कारण तिचे व्यावसायिक नसून तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. अथिया आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुल यांचे नाते सर्वश्रुत आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्या कायम चर्चेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, या जोडप्याच्या लग्नाच्या तारखांची एक मोठी अपडेट समोर आली
 
रिपोर्टनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचे विधी २१ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान पार पडणार आहेत. या जोडप्याच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. केएल राहुलशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, दोघांच्या लग्नाचे आमंत्रण डिसेंबरच्या अखेरीस पाठवले जाईल. 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये हळद, मेहंदी आणि संगीत ठेवण्यात येणार असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. यासोबतच केएल राहुल आणि अथिया दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
 
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नानंतर एक भव्य रिसेप्शन आयोजित केले जाईल, ज्यामध्ये बॉलिवूड आणि खेळाशी संबंधित सर्व सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत
 
Edied By - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

लवयापाचे रोमँटिक गाणे 'रेहना कोल' रिलीज

एकेकाळी घरोघरी भटकावे लागले होते, आज आहे सर्वात प्रसिद्ध गीतकार

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

सर्व पहा

नवीन

पायाच्या दुखापतीनंतर रश्मिका मंदानाने विमानतळावर व्हीलचेअरचा आधार घेतला

श्रद्धा कपूरने वडील शक्ती कपूर सोबत मुंबईत खरेदी केले घर, किंमत जाणून आश्चर्य होईल

Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या

कोल्हापूरमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

ब्रेकअप विसरून पुन्हा एकत्र आले मलायका-अर्जुन!

पुढील लेख
Show comments