सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असलेलं गाणं बचपन का प्यार (Bachpan Ka Pyar) सहदेव कुमार दिर्डो (Sahadev Kumar Dirdo) याने गायलं होतं. हे सोशल मीडिया वर प्रचंड लोकप्रिय झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सहदेव सतत चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही सहदेवच्या या गाण्यावर रील्स, व्हिडिओज बनवले होते. त्यामुळे त्याच्या गाण्याचे मोठे चाहते निर्माण झाले.