Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे दुखावली,मुलाखत देण्यास स्पष्टपणे नकार दिला!

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2024 (15:31 IST)
मुनावर फारुकीने 'बिग बॉस 17' च्या विजेत्याची ट्रॉफी जिंकली. सीझनचा विजेता घोषित होण्याच्या काही मिनिटांपूर्वी शोमधून बाहेर पडलेल्या अंकिता लोखंडेला सेटमधून बाहेर पडताना चाहत्यांनी वेढले होते. अंकिता लोखंडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये अंकिता खूपच निराश दिसत आहे. तिने पापाराझींशी बोलण्यासही नकार दिला. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. 
 
एका व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे खूपच नाराज दिसत आहे. ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून जात असताना मीडिया आणि चाहत्यांनी तिला घेरले. अभिनेत्रीची टीम गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असताना तिची आई त्यांच्या मागे चालताना दिसली. अंकिता सर्वांना 'रिलॅक्स' म्हणताना ऐकू येते. पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये अंकिता लोखंडे खूपच सुंदर दिसत होती.17 व्या हंगामात अभिनेत्री चौथ्या स्थानावर राहिली.
 
अंकिता लोखंडेचा हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. यावर युजर्स या वर  तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया दिली की, 'ती आता खरोखरच दुखावलेली वाटत आहे.' दुसऱ्याने लिहिले, तिने कुटुंबाला प्राधान्य दिले आणि मुलाखत देण्यास नकार दिला. असे करून तिने मने जिंकली.
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेत्री रती अग्निहोत्री बनली आजी, मुलगा तनुज विरवानी बनला बाबा

उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाचे कारण काय? 8 वर्षांनंतर पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

ज्येष्ठ तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाला

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

सर्व पहा

नवीन

हॅरी पॉटर फेम अभिनेत्री 'डेम मॅगी स्मिथ' यांचे निधन

Lata Mangeshkar Birthday : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य

बिगबॉस मराठी मध्ये राखी सावंतची जोरदार एंट्री!

Bhool Bhulaiyaa 3: कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज

भारतातील पाच प्रसिद्ध दुर्गा मंदिर

पुढील लेख
Show comments