पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानवर आधारित असलेल्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर झालं. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानवर आधारित हा सिनेमा आहे. यासंबंधीच अक्षय कुमारने त्यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. श्री नारायण सिंह दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमार, भुमी पेडणेकर, अनुपम खेर आणि सना खान यांचीही भूमिका आहे. यावर्षी 11 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.