suvichar

लूक बदलून आयुष्यमान चित्रपटगृहात

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2019 (13:38 IST)
अभिनेता आयुष्यमान खुरानाचा 'आर्टिकल 15' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली असून चित्रपटातील आयुष्यमानची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. तसेच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या जादूमुळे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आनंदी असल्याचे दिसत आहे. सध्या आयुष्यमान त्याचा आगामी चित्रपट 'बाला'च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लखनऊमध्ये सुरु असलेल्या चित्रीकरणादरम्यान वेळ काढून आयुष्यमान 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक आणि टीमच्या इतर सदस्यांना घेऊन 'आर्टिकल 15' पाहण्यासाठी पोहोचला. 'बाला' चित्रपटाची टीम 'आर्टिकल 15' प्रदर्शित झाल्यापासून आयुष्यमानकडे चित्रपट दाखवण्याची मागणी करत होते. शेवटी आयुष्यमान 'बाला' चित्रपटाचे चित्रीकरण संपवून हॉटेल जवळील एका चित्रपटगृहामध्ये पोहोचला. दरम्यान आयुष्यमानने त्याचा लूक बदलला होता. चाहत्यांपासून वाचण्यासाठी आयुष्यमानने चित्रपट सुरु झाल्यावर चित्रपटगृहामध्ये एण्ट्री केली तर चित्रपट संपताच चित्रपटगृहाबाहेर धावही घेतली. 'आर्टिकल 15' चित्रपटातील आयुष्यमानचा अभिनय पाहत सर्व टीमने आणि बाला चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक यांनी आयुष्यमानची प्रशंसा केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मरणार्थ आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार

Parashuram Jayanti भगवान परशुराम यांचे काही प्रमुख प्राचीन मंदिरे

धुरंधर मालिकेतील दोन्ही चित्रपटांनी मिळून ₹३,००० कोटींचा टप्पा ओलांडला, जिओ स्टुडिओजसाठी एक मोठे जागतिक यश

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मरणार्थ आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार हृदयनाथ मंगेशकर यांनी केली घोषणा

प्रसाद ओकच्या घरात सनई-चौघडे: अभिनेत्याची होणारी सून मारवाडी; सोशल मीडियावर साखरपुड्याच्या फोटोंची चर्चा

पुढील लेख
Show comments